Indapur Assembly Constituency | साड्या नको विकास हवा म्हणत नेत्याने दिलेल्या साड्या महिलांनी रस्त्यावर फेकल्या ; इंदापूर तालुक्यात जोरदार चर्चा
इंदापूर: Indapur Assembly Constituency | इंदापूर विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची आणि चर्चेची असणार आहे. याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) विद्यमान आमदार आहेत त्यामुळे ही जागा महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार (Mahayuti Seat Sharing Formula) अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी यामुळेच भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (Sharad Pawar NCP) प्रवेश केला. त्यामुळे आता दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील म्हणजे घड्याळ विरोधात तुतारी असा सामना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान कळंब गावच्या हद्दीतील महिलांनी दत्तात्रय भरणे यांच्या मार्फत देण्यात आलेल्या साड्या रस्त्यांवर फेकून दिल्या आहेत. साड्यांचे आमिष दाखवून तुम्ही मते मागता आहात. विकास कुठे आहे अशी विचारणा करत आम्हाला साड्या नको विकास हवा आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मागील दोन आठवड्यापासून इंदापूर तालुक्यात गावागावातील प्रत्येक घरात दत्तात्रय भरणे यांचे छायाचित्र असणा-या पिशवीतील साड्यांचे वाटप करण्यात येत आहे. मतदारांच्या घरात किती महिला मतदार आहेत याची व्यवस्थित यादी करण्यात आली आहे.
त्या यादीनुसार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून साड्यांचे वाटप करण्यात येत आहे (Ghodke Wasti Indapur). वालचंदनगर नजीक असणाऱ्या कळंब गाव व परिसरातील वाड्या वस्त्यांवरही साड्या पोहोचवण्यात आल्या. यावेळी घोडकेवस्ती वरील महिलांनी या साड्या घेण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती आहे. (Refuse Sarees Distributions)
घोडकेवस्तीवर वीज, पाणी, रस्ते यांची सुविधा नाही. घोडकेवस्तीवरुन पवारवस्तीकडे जाणा-या कच्च्या रस्त्यावरुन ये-जा करणे अवघड होते. सायकलवरुन ये-जा करणा-या शाळकरी मुलांच्या सायकली घसरतात. वीज द्यावी यासाठी तीन-तीन वेळा सरपंचांना सांगितले, मात्र ते मागणीकडे कानाडोळा करत आहेत, अशा तक्रारी महिलांनी मांडल्या.
तरुणांना नोकऱ्या नाहीत या वस्तुस्थितीकडे ही त्यांनी लक्ष वेधले. पासष्ट वर्षावरील महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ का मिळत नाही. त्या सरकारच्या सावत्र बहिणी आहेत का? असा सवाल एका वयोवृद्ध महिलेने विचारला. दरम्यान या घटनेची इंदापूर तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Politics News | उद्धव ठाकरे फडणवीसांची भेट? अमित शहांना राऊतांचा फोन?
या चर्चेवर काँग्रेसचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘आमच्यात भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न’
Mumbai High Court News | ’50 खोके एकदम ओके’ ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले;
सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच – हायकोर्टाचे निरीक्षण