Rohit Pawar News | ‘हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ ! रोहित पवारांनी सुनावलं, म्हणाले – ‘सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25-25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा’
पुणेरी आवाज – Rohit Pawar News | पुण्याजवळील खेडशिवापूर टोल नाका (Khed Shivapur Toll Naka) येथील निवडणूक आयोगाच्या चेक पोस्टच्या तपासणीत एका गाडीतून पाच कोटी रूपये मिळाल्याचं समोर आल्यानंतर आता राज्य सरकारवर सडकून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला सुनावतं म्हटलं आहे की, ‘हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधार्यांनी लक्षात ठेवावं! महाराष्ट्राशी गद्दारी करणार्यांना इथली जनता पर्मनंट घरी पाठवणार हे नक्की आहे.
रोहित पवार यांनी इन्स्टाग्राम पोस्ट करत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटंले आहे की, सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25-25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगार झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत?
लोकसभेला सत्ताधार्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानीजनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणार्या खोकेबाजांना इथली जनता Ok करून डोंगर दर्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधार्यांनी लक्षात ठेवावं!
रक्कम कोणाची अद्याप अस्पष्ट
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक राजेश गवळी व पथकाने सायंकाळी सहा वाजता पुण्याच्या बाजूने आलेली मोटार तपासणीसाठी थांबवली. या मोटारीत चालकासह चौघेजण होते. पोलिसांनी चौकशी करून मोटार चौकीमध्ये नेऊन तपासणी केली असता, मोठ्या रकमेची बंडल कागदी आवरणात बंद केल्याचे आढळून आले. पोलिसांनी पंचासमक्ष आवरण खोलून रकमेची मोजणी सुरू केली. मोटारीबाबत अधिक माहिती घेतली असता ती अमोल शहाजीराव नलावडे (रा. श्रृंगीमेटकरवाडी, सोलापूर) यांच्या नावाने नोंद असल्याचे समजले. पुढील तपास सुरू आहे.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Politics News | उद्धव ठाकरे फडणवीसांची भेट? अमित शहांना राऊतांचा फोन?
या चर्चेवर काँग्रेसचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘आमच्यात भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न’
Mumbai High Court News | ’50 खोके एकदम ओके’ ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले;
सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच – हायकोर्टाचे निरीक्षण