Pune Crime News | 50 लाख रुपयांची फसवणूक झाल्याने व्यापार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या; 7 जणांवर गुन्हा दाखल

Suicide

पुणे : Pune Crime News | जादा फायदा करुन देतो, असे आमिष दाखवून पैसे घेऊन फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याने व्यापार्‍याने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केली (Suicide Case). याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police) सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

रमजान साचे (वय ४४, रा. अंगारशहा टकीया, भवानी पेठ) असे आत्महत्या केलेल्या व्यापार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुनिल बेले, अफरसर शेख, मतीन शेख, हैदर शेख, असिफ, मुजम्मिल पटवेकर आणि संजीव बजारमठ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमजान साचे हे कपड्यांचे व्यापारी होते. त्यांची पत्नी शाळेत शिक्षिका आहे. रमजान यांना जास्त फायदा करुन देतो, असे सांगून आरोपींनी त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले/ जवळपास ५० लाख रुपयांहून अधिकची रक्कम आरोपींनी त्यांच्याकडून घेतली. त्यासाठी त्यांनी बँकेचे कर्जही घेतले होते. मात्र, जेव्हा त्यांनी पैसे परत मागितले. तेव्हा आरोपींनी त्याना पैसे परत करण्यास नकार दिला.

हा मानसिक त्रास सहन न झाल्याने १४ ऑक्टोबर रोजी रमजान यांनी घरात लोखंडी अ‍ँगलला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी अगोदर अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती. त्यांच्या पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर अधिक तपास करीत आहेत.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | उद्धव ठाकरे फडणवीसांची भेट? अमित शहांना राऊतांचा फोन?
या चर्चेवर काँग्रेसचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘आमच्यात भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न’

Mumbai High Court News | ’50 खोके एकदम ओके’ ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले;
सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच – हायकोर्टाचे निरीक्षण

Ravindra Dhangekar | दिवाळी कीट वाटपप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या संस्थेवर गुन्हा दाखल; धंगेकर म्हणाले – ‘नागरिकांच्या घरात आनंदाची पणती प्रज्वलित व्हावी, म्हणून…’