Pune Rural Police News | रांजणगाव एमआयडीसीत आश्रय घेतलेल्या 21 बांगलादेशी नागरिकांना अटक; बांगला देशींकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्डही (Video)
पुणे : Pune Rural Police News | रांजणगाव एमआयडीसीमध्ये गेल्या काही वर्षांपासून वास्तव करुन असलेल्या २१ बांगलादेशी नागरिकांना ग्रामीण पोलीस दलाने अटक केली आहे. त्यामध्ये १५ पुरुष, ४ महिला व २ तृतीयपंथी यांचा समावेश आहे. या बांगला देशी नागरिकांपैकी ९ जणांकडे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड व एकाकडे बनावट मतदान कार्डही आढळून आले आहे. (Bangladeshi nationals held for illegal stay in Pune)
https://www.instagram.com/p/DBbbJtFp9Hc
याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (Pankaj Deshmukh IPS) यांनी माहिती दिली. हे सर्व बांगला देशी मोलमजुरी करतात. त्यातील काही जण सहा महिन्यांपूर्वी, काही वर्षापूर्वी तर काही ७-८ वर्षांपासून येथे राहून मजुरी करीत आहेत.
दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार (Prakash Pawar API) हे आपल्या पथकासह रांजणगाव पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये पेट्रोलिंग करता असताना त्यांच्या पथकातील सहायक फौजदार विशाल गव्हाणे यांना माहिती मिळाली की, रांजणगाव एमआयडीसी मधील कारेगाव परिसरात काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे रहात आहेत. त्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रांजणगाव एमआयडीसीचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादा विरोधी शाखेमधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कारेगाव परिसरातमध्ये शोध घेऊन २१ बांगला देशींना पकडले.
अजमुल सरतखान ऊर्फ हसिफ खान (वय ५०), मोहम्मद अकबर अजीज अकबर सरदार (वय ३२), शफिकउल अलीमिया शेख (वय २०), हुसेन मुखिद शेख (वय ३०), तरिकुल अतियार शेख (वय ३८), मोहम्मद हुसेन शेख (वय ३२), रौफ अकबर दफादार (वय ३५), शाहिन शहाजान शेख (वय ४४), मोहम्मद उमर फारुख बाबु ऊर्फ बाबु बुकतीयार शेख (वय ३२), इब्राहिम काजोल शेख (वय ३५), फरीद अब्बास शेख (वय ४८), मोहम्मद सद्दाम अब्दुल सखावती (वय ३५), मोहम्मद अब्दुल हबीब रहेमान सरदार (वय ३२), आलीमिया तोहकील शेख (वय ६०), मोहम्मद इसराईल फकीर (वय १८), सलमा मलीक रोशन मलिक (वय २३), हिना मुल्ला जुल्फीकार मुल्ला (वय ४०), सोनदिप ऊर्फ काजोल बासुदिप बिशेश (वय ३०), येअणुर शहदाता मुल्ला (वय २५, सर्व रा़ कारेगाव मुळ बांगला देश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहायक फौजदार विशाल गव्हाणे, हवालदार विशाल भोरडे, रवींद्र जाधव, पोलीस अंमलदार मोसीन शेख, ओंकार शिंदे, तसेच रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार डी आर शिंदे, हवालदार विजय सरजीने, विलास आंबेकर, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, पोलीस हवालदार विद्या बनकर, पोलीस अंमलदार शितल रौंध यांच्या पथकाने केली आहे.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा