Pune Crime News | कुर्डवाडीहून पुण्यात येऊन रेल्वेखाली जोडप्याची आत्महत्या
पुणे : Pune Crime News | मुळचे कर्नाटकातील एकाच गावाच्या व कुर्डवाडी येथे राहणार्या जोडप्याने पुण्यात येऊन रेल्वे खाली आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Suicide Case)
हिरगप्पा शरणाप्पा जमादार (वय ५०) आणि सौमयशरी सिद्धलिंग मड्डे (वय २७, दोघे रा. मदगुनकी, पो. झळकी बुद्रुक, जि. कलबुर्गी, कर्नाटक) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत लोहगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशन (Pune Railway Station) प्लॉटफॉर्म क्रमांक ४ जवळील रेल्वे रुळावर मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्यापूर्वी एका पुरुष व स्त्री यांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. घटनास्थळावर मिळालेल्या सॅकमध्ये त्यांची आधार कार्ड मिळाले. त्यावरुन त्यांची ओळख पटली. दोघेही कर्नाटकातील एकाच गावचे राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला.
ते सध्या कुर्डवाडी येथे राहत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. त्यांच्याकडे कुर्डवाडी ते पुणे असा प्रवासाचे तिकीट मिळाले आहे. दोघांची ओळख पटली असली तरी पुण्यात येऊन आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप समजून आले नाही. सहायक पोलीस निरीक्षक देसाई तपास करीत आहेत.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rural Police News | रांजणगाव एमआयडीसीत आश्रय घेतलेल्या 21 बांगलादेशी नागरिकांना अटक;
बांगला देशींकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्डही (Video)