Pune Crime Branch News | लोणीकंद दुहेरी खून प्रकरणातील मोक्याच्या गुन्ह्यातील एसएस टोळीतील 3 वर्षापासून फरार गुन्हेगार जेरबंद

Pune Crime News | A young man was beaten up and stabbed in the stomach over money for digging a well near his village; Wagholi police arrested three people

पुणे : Pune Crime Branch News | लोणीकंद येथील एस एस टोळी (SS Gang Pune) प्रमुख सचिन नानासाहेब शिंदे याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी दुहेरी खून (Double Murder In Lonikand) केलेल्या टोळीतील मोका अंतर्गत गुन्ह्यातील ३ वर्षांपासून फरार (Abscond In MCOCA) असलेल्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च पथकाने जेरबंद केले आहे.(Pune Crime Branch News)

ऋग्वेद ऊर्फ छकुल्या जालिंदर वाळके (वय २३, रा. पेरणे टोलनाक्याजवळ, पेरणे) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. एस एस टोळीचा प्रमुख सचिन नानासाहेब शिंदे याचा खून करण्यात आला होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी निखिल देवानंद पाटील व त्याच्या साथीदारांनी १२ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी लोणीकंद येथे सनी कुमार शिंदे व कुमार मारुती शिंदे यांचा धारदार शस्त्राने वार करुन खून केला होता. या गुन्ह्यानंतर ऋग्वेद हा फरार झाला होता. तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta IPS) यांनी एस एस टोळीचा म्होरक्या निखील देवानंद पाटील याच्यासह २३ साथीदारांवर मोक्का (Pune Police MCOCA Action) अंतर्गत कारवाई केली होती. तेव्हा पासून ऋग्वेद फरारी होता.

गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार व्यवहारे ताकवणे, पवार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गेली ३ वर्षे फरार असलेला गुंड ऋग्वेद हा घरी येणार आहे. या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्याच्या राहत्या घरावर पाळत ठेवली. तो घरी आल्याचे समजताच त्यांनी ऋग्वेद याला ताब्यात घेतले.

ऋग्वेद याच्यावर दुहेरी खुनाबरोबरच खून, गंभीर दुखापत,
बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे ४ गुन्हे लोणीकंद, शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे,
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वहिद पठाण व त्यांच्या सहकार्‍यांनी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Rural Police News | रांजणगाव एमआयडीसीत आश्रय घेतलेल्या 21 बांगलादेशी नागरिकांना अटक;
बांगला देशींकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्डही (Video)

Pune Crime News | कुर्डवाडीहून पुण्यात येऊन रेल्वेखाली जोडप्याची आत्महत्या

You may have missed