Hinjewadi Pune Crime News | विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पकडून गावठी पिस्टल, काडतुसे हस्तगत
पिंपरी : Hinjewadi Pune Crime News | बेकायदेशीर पिस्टल बाळगून विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station) पकडून त्याच्याकडून पिस्टल व दोन काडतुसे जप्त केली आहेत. (Pistol Seized)
प्रविण भाऊसाहेब वाघमारे Pravin Bhausaheb Waghmare (वय २५, रा़ शिवुर, ता़ जामखेड, जि़ अहमदनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार रवि प्रकाश पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी सोमवारी सकाळी हद्दीत गस्त घालत होते. यावेळी वाकडमधील पुणे मुंबई महामार्गाच्या अंडरपासजवळ भूमकर चौकाकडे जाणार्या सर्व्हिस रोडवर एक जण थांबला असून त्याच्याकडे अग्निशस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या प्रविण वाघमारे याला पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ३० हजार रुपयांचे गावठी बनावटीचे पिस्टल व १ हजार रुपयांचे दोन जिवंत काडतुसे मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक पांचाळ तपास करीत आहेत. (Hinjewadi Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rural Police News | रांजणगाव एमआयडीसीत आश्रय घेतलेल्या 21 बांगलादेशी नागरिकांना अटक;
बांगला देशींकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्डही (Video)
Pune Crime News | कुर्डवाडीहून पुण्यात येऊन रेल्वेखाली जोडप्याची आत्महत्या