Parvati Pune Crime News | भांडणात समजून सांगणार्‍यावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

marhan

पुणे : Parvati Pune Crime News | गाडी आडवी का घातली याचा जाब विचारणासाठी गेल्याने झालेल्या वादात तरुणाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, चिडलेल्या टोळक्याने त्याच्यावरच कोयत्याने वार (Koyta Attack) करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)

संतोष साळुंखे असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत समीर आत्माराम महादे (वय ३२, रा़ सिद्धार्थ शोरुमजवळ, सिंहगड रोड) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकाश म्हस्के, गणेश रेणुसे, तेजस नायर, रोहित खडके, भैय्या पालखे, मयुर पालखे, प्रथमेश रेणुसे, अजय घाडगे व त्यांच्या एका साथीदारावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजता सिंहगड रोडवरील (Sinhagad Road Pune) महालक्ष्मी बिल्डिंगजवळ घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना गाडी आडवी का घातली़ असे विचारण्यासाठी फिर्यादीबरोबर रिची मस्के, आकाश सूर्यवंशी, मीर खोचाडे, यश डोळे, अजीत थोरात, अर्थव रणदिवे, गणेश (सर्व रा. स. नं. १३२ झोपडपट्टी, सिंहगड रोड) हे गेले होते. यावेळी त्यांची आरोपी बरोबर बाचाबाची झाली. फिर्यादीचा मावस भाऊ संतोष साळुंखे हा तेथे आला. तो समजावून सांगत असताना आरोपींनी फिर्यादीच्या दिशेने दगडफेक केली. त्याचवेळी तेजस नायर याने तुम्हाला एकेएकाला सोडत नाही़ संपवतोच असे म्हणून कोयत्याने संतोष साळुंखे याच्यावर डोक्यावर, हातावर सपासप वार करुन गंभीर जखमी केले. फिर्यादी व रिची म्हस्के यांनाही पाठीत दगड मारुन दुखापत केली. आरोपींच्या दहशतीमुळे तेथील आजूबाजूच्या लोकांनी दुकाने बंद केली. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक नामदे तपास करीत आहेत. (Parvati Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Rural Police News | रांजणगाव एमआयडीसीत आश्रय घेतलेल्या 21 बांगलादेशी नागरिकांना अटक;
बांगला देशींकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्डही (Video)

Pune Crime News | कुर्डवाडीहून पुण्यात येऊन रेल्वेखाली जोडप्याची आत्महत्या

You may have missed