Shivsena Shinde Group | शिंदेंच्या शिवसेनेकडून मुलं, भाऊ व पत्नीला उमेदवारी; नव्या उमेदवारांऐवजी प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांना विधानसभेचे तिकीट
मुंबई: Shivsena Shinde Group | आगामी विधानसभा निवडणूका (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर आहेत. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. महायुतीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ४५ नावे आहेत. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), उदय सामंत (Uday Samant) यांच्यासह स्वतःचीही उमेदवारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केली आहे. (Shivsena Shinde Group)
महायुतीचे नेते विरोधी पक्षांवर सातत्याने घराणेशाहीचे आरोप करत असतानाच भाजपासह त्यांच्या मित्रपक्षांमध्ये देखील घराणेशाही पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांची घोषणा केली असून यामध्ये अनेक असे चेहरे आहेत ज्यांचे वडील, पती अथवा भाऊ विद्यमान आमदार किंवा माजी मंत्री आहेत.
पक्षाकडून अनेक मतदारसंघांमध्ये नव्या व तरुण उमेदवारांऐवजी प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे. एरंडोल, दर्यापूर, पैठण, जोगेश्वरी पूर्व, राजापूर व खानापूर मतदारसंघातून प्रस्थापित नेत्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
त्यामध्ये शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीतून तर त्यांच्या भावाला म्हणजेच किरण सामंत यांना राजापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी मंत्री रवींद्र वायकर हे आता वायव्य मुंबईचे खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून म्हणजेच जोगेश्वरी पूर्व मधून त्यांच्या पत्नीला म्हणजेच मनिषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसघातून शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ
यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर, एरंडोलमधूल अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
माजी मंत्री संदीपान भुमरे हे आता छत्रपती संभाजीनगरचे खासदार झाले आहेत.
त्यामुळे त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पैठण विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या
मुलाला म्हणजेच विलास भुमरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
सांगलीच्या खानापूरमधून अनिल बाबर यांचे पूत्र सुहास बाबर यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rural Police News | रांजणगाव एमआयडीसीत आश्रय घेतलेल्या 21 बांगलादेशी नागरिकांना अटक;
बांगला देशींकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्डही (Video)
Pune Crime News | कुर्डवाडीहून पुण्यात येऊन रेल्वेखाली जोडप्याची आत्महत्या