Water Tank Collapses In Bhosari Pune | भोसरीमध्ये पाण्याची टाकी कोसळून तिघा मजुरांचा मृत्यु ! सात जण जखमी (Video)

पिंपरी : Water Tank Collapses In Bhosari Pune | भोसरी येथील सदगुरु नगर (Sadguru Nagar Bhosari) मध्ये पाण्याची टाकी कामगारांच्या अंगावर कोसळल्याने झालेल्या अपघातात तिघा मजुरांचा मृत्यु झाला असून ६ ते ७ मजूर जखमी झाले आहेत.
https://www.instagram.com/p/DBfn6uDpt3f
भोसरीतील सदगुरु नगर येथे लेबर कॅम्पमध्ये राहणार्या मजुरांसाठी १२ फुट उंचीची पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. झारखंड, बिहार म्हणून आलेले मजूर येथील लेबर कॅम्पमध्ये राहतात.
आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास काही मजूर पाण्याच्या टाकीखाली अंघोळ करत होते. त्याचवेळी ही पाण्याची टाकी कोसळली. त्या खाली अनेक मजूर खाली दबले गेले. जागेवरच ३ मजुरांचा मृत्यु झाला. सहा ते सात मजूर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एका मजुराचा उपचार सुरु असताना मृत्यु झाला. निकृष्ट बांधकामामुळे ही पाण्याची टाकी कोसळल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी पाण्यासाठी येथे राहत असलेल्या मजुरांनी आंदोलन केले होते. त्यानंतर या लेबर कॅम्पमधील टाकीला सुरळीत पाणीपुरवठा सुरु झाला आणि आता त्याच पाण्याच्या टाकीने चौघांचा बळी घेतला. (Water Tank Collapses In Bhosari Pune)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rural Police News | रांजणगाव एमआयडीसीत आश्रय घेतलेल्या 21 बांगलादेशी नागरिकांना अटक;
बांगला देशींकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्डही (Video)
Pune Crime News | कुर्डवाडीहून पुण्यात येऊन रेल्वेखाली जोडप्याची आत्महत्या