Pune PMC News | आगीच्या घटनेमुळे मध्यवर्ती भागातील अभ्यासिकांची अग्निशामक दलामार्फत तपासणी मोहीम सुरु

Fire Safety Audit

पुणे – Pune PMC News | नुकतेच नवी पेठेतील (Navi Peth Pune) अभ्यासिकेला लागलेल्या आगीनंतर मध्यवर्ती शहरातील अभ्यासिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अशा घटना टाळण्यासाठी आग प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत अभ्यासिकांची तपासणी करून संबधितांमध्ये जनजागृती करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale) यांनी अग्निशामक दलाला दिले आहेत. त्यानुसार अग्निशामक दल आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांनी संयुक्तपणे सदाशिव पेठेतील (Sadashiv Peth Pune) अभ्यासिकांची तपासणी करत काहींना नोटीसेस बजावल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. (Prithviraj B P) यांनी दिली. (Fire Safety Audit Of All Study Halls In Pune)

नुकतेच नवी पेठेतील एका इमारतीत सुरू असलेल्या युपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेमध्ये आग लागली. याठिकाणी असलेल्या पुस्तके, वह्या आणि फर्निचरमुळे आग वेगाने पसरली. अग्निशामक दलाने वेळेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. या घटनेची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी संपुर्ण राज्यभरातून विद्यार्थी येतात.प्रामुख्याने सदाशिव आणि नवी पेठेमध्ये मोठ्या प्रमाणात अभ्यासिका, खानावळी, पुस्तकांची दुकाने आणि क्लासेस आहेत. त्यामुळे या परिसरात हजारो विद्यार्थी येतात. अनेक स्थानीकांनी राहात्या घरात आणि इमारतींमध्ये या अभ्यासिका आणि हॉस्टेल्स सुरू केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा व अन्य कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत का याची तपासणी करून संबधितांना तशा सूचना करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि अग्निशामक दलाने संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. निवासी वास्तूंचा व्यावसायिक वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना व्यावसायिक कर आकारणी करण्याच्या सूचना देखिल मिळकत कर विभागाला केल्याचे पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अभ्यासिकांमध्ये आगी सारख्या घटनांमध्ये योग्य काळजी
घेण्याबाबत महापालिकेने अग्निशामक दलाला अभ्यासिका तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.
अभ्यासिकांमुळे होणार्‍या त्रासाबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत, तसेच अभ्यासिका चालकांचेही काही म्हणणे आहे.
दोन्हीकडील बाजू ऐकून घेउन विद्यार्थ्यांच्या अभ्यासतही खंड पडणार नाही, असा मध्यम मार्ग काढण्यात येईल.

  • डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Rural Police News | रांजणगाव एमआयडीसीत आश्रय घेतलेल्या 21 बांगलादेशी नागरिकांना अटक;
बांगला देशींकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्डही (Video)

Pune Crime News | कुर्डवाडीहून पुण्यात येऊन रेल्वेखाली जोडप्याची आत्महत्या

You may have missed