Maharashtra Assembly Election 2024 | महाविकास आघाडीत खांदेपालट होणार; शिवसेना ठाकरे गट जाहीर केलेल्या यादीतील उमेदवार बदलण्याच्या तयारीत

sharad pawar uddhav thackeray

धाराशिव: Maharashtra Assembly Election 2024 | महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी या यादीत काही दुरुस्ती होणार असल्याची माहिती संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली होती. त्यानंतर आता धाराशिव जिल्ह्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

उद्धव ठाकरे धाराशिव जिल्ह्यातील उमेदवारांत बदल करणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही जागा शरद पवार (Sharad Pawar NCP) यांच्या पक्षाला मिळू शकते.

परंडा या विधानसभा मतदारसंघासंदर्भात (Paranda Assembly Constituency) महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. सध्या पक्षाने या जागेसाठी रणजित ज्ञानेश्वर पाटील (Ranjit Dnyaneshwar Patil) यांना उमेदवारी दिली आहे. याच जागेसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे (Rahul Mote) यांनी दावा केला आहे.

राहुल मोटे हे सलग तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. तसेच त्यांनी तानाजी सावंत यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे ते परंडा या जागेसाठी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Constituency | जोरदार शक्तीप्रदर्शन आणि कोथरुडकरांची साथ ! चंद्रकांत पाटील यांनी दिग्गजांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज (Video)

Pune PMC News | आगीच्या घटनेमुळे मध्यवर्ती भागातील अभ्यासिकांची अग्निशामक दलामार्फत तपासणी मोहीम सुरु

Pune PMC News | एसटीपीतील पाणी तळजाई वनविभागाला देता येईल? महापालिकेची वन विभागासोबत चर्चा सुरू

You may have missed