Ambegaon Assembly Election 2024 | दिलीप वळसे पाटलांना पाठिंबा देण्यावरून महायुतीत फूट; पत्रकार परिषदेतच झाला राडा; जाणून घ्या

Dilip Walse Patil

पुणे: Ambegaon Assembly Election 2024 | महायुतीतील उमेदवारी (Mahayuti Candidate) याद्या जाहीर झाल्यानंतर अनेकांची नाराजी आता समोर येताना दिसत आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे (Ajit Pawar NCP) आमदार आणि मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या (Dilip Walse Patil) उमेदवारी अर्ज भरण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

शिंदेंच्या शिवसेनेच्या आदिवासी विभागाचे प्रमुख विजय आडारी यांनी दिलीप वळसेंना विरोध दर्शविला. मला पक्षाची बैठक असल्याचे सांगून बोलवले. प्रत्यक्षात इथं दुसराच ठराव घेतला जात आहे. मुळातच मला हे मान्य नाही. वळसेंनी वेळोवेळी त्रास दिला. माझं जगणं त्यांच्यामुळं कठीण झालं आहे. त्यामुळं मी आणि माझे समर्थक वळसेंचा प्रचार करणार नाही. आम्ही आत्ताच्या आत्ता पक्षातून बाहेर पडत आहोत, असे जाहीर करत आडारी पत्रकार परिषदेतून निघून गेले.

विजय आडारी म्हणाले, ” त्यांचा सभापती निवडून आणताना आणि बाकी सर्व कामात त्यांना मदत केली, मात्र, बाकी आदीवासी भागात त्यांच्याकडून मला मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आहे. मी माझा जीव मुठीत धरून दिवस काढतोय. मी आत्ता या क्षणी पक्ष सोडला आहे. मी पुढची भूमिका आत्ताच सांगणार नाही”, असे आडारी यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Constituency | जोरदार शक्तीप्रदर्शन आणि कोथरुडकरांची साथ ! चंद्रकांत पाटील यांनी दिग्गजांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज (Video)

Pune PMC News | आगीच्या घटनेमुळे मध्यवर्ती भागातील अभ्यासिकांची अग्निशामक दलामार्फत तपासणी मोहीम सुरु

Pune PMC News | एसटीपीतील पाणी तळजाई वनविभागाला देता येईल? महापालिकेची वन विभागासोबत चर्चा सुरू

You may have missed