Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या पोटात चाकू खुपसून खुनाचा प्रयत्न

पुणे / पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला (Character Doubt Wife) मारहाण करुन तिच्या पोटात चाकू खुपसून तिचा खून (Attempt To Murder) करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी (Chakan Police) सतीश ऊर्फ शिवा राजू धोत्रे (रा. खंडोबा माळ, चाकण) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३० वर्षाच्या महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार बुधवारी पहाटे ३ वाजता त्यांच्या चाकणमधील राहत्या घरी घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश हा आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला शिवीगाळ करुन मारहाण करीत असे. बुधवारी पहाटे याच कारणावरुन त्याने पत्नीशी भांडण सुरु केले. यावेळी झालेल्या वादात त्याने घरातील भाजी कापण्याची सुरी आणली़. रागाच्या भरात पत्नीच्या पोटात खुपसली. तसेच दोन्ही हातापायावर वार करुन गंभीर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक गावडे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune PMC News | एसटीपीतील पाणी तळजाई वनविभागाला देता येईल? महापालिकेची वन विभागासोबत चर्चा सुरू