Sassoon Hospital Scam | ससूनमध्ये आणखी एक घोटाळा उघड ! 4 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी कोर्टाने आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

sassoon hospital

पुणे : Sassoon Hospital Scam | ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या रुग्णालयात तब्बल ४ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. बँक खात्यातून तब्बल ४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीनही न्यायालयाने फेटाळला आहे.

३१ जुलै २०२३ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत हा घोटाळा झाला असल्याची माहिती आहे. एकूण २५ जणांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससूनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या बँक ऑफ बडोदा खात्यातून ४ कोटी १८ लाख ६२ हजार ९४२ रुपये काढून स्वतःसह अन्य आरोपींच्या खात्यावर जमा केले. रुग्णालयात अकाउंटंट म्हणून काम करणारे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी अनिल माने आणि रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार यांचा हा प्रकरणात प्रमुख हात असल्याचे समोर आले आहे. त्यांनी रुग्णालयाच्या बँक ऑफ बडोदा खात्यातून ४ कोटी १८ लाख ६२ हजार ९४२ रुपये काढले. तसेच स्वतःसह अन्य आरोपींच्या खात्यावर जमा केले.

रुग्णालयाच्या आर्थिक नोंदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे ससून प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील १३ आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. हा गुन्हा फार मोठा आहे.

आरोपींनी हा घोटाळा का केला. बँकेतील रक्कम कुणाला दिली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवणे महत्वाचे आहे.
मात्र आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला तर ही उत्तरे मिळवणे फार कठीण होईल, असा युक्तिवाद त्यांनी केला.
त्यावर न्यायालयाने देखील अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

यामध्ये रुग्णालयाच्या वरिष्ठ सहायक रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार, संतोष जोगदंड, अधिपरिचारिका सुमन वालकोळी,
दयाराम कछोटिया, शेखर कोलार, अनिता शिंदे, कक्षसेवक नीलेश शिंदे, अर्चना अलोटकर, वरिष्ठ लिपिक दीपक वालकोळी,
सेवानिवृत्त सीटी स्कॅन तंत्रज्ञ उत्तम जाधव, कनिष्ठ लिपिक श्रीकांत श्रेष्ठ, राखी शहा,
वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक संदीप खरात यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण