Badlapur School Case | बदलापूर घटनेनंतरही पोलिसांच्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोनात झाला नाही बदल

rape-case

अतिरिक्त सरकारी वकिलांच्या पत्राची चार महिन्यांनी दखल, पोलिसांचे म्हणणे न्यायालयात सादर करण्याकडे होतेय दुर्लक्ष

पुणे : Badlapur School Case शाळेतील शिपाई असलेल्या कर्मचार्‍याने चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास चालढकल केल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर उग्र आंदोलन करुन संपूर्ण रेल्वे वाहतूक बंद पाडली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. तेथील प्रभारी पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. असे असले तरी केवळ बदलापूरच नाही तर सर्वत्र अशीच परिस्थिती दिसून येत आहे. बाल लैंगिक अत्याचाराबाबतच्या गुन्ह्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अतिरिक्त सरकारी वकिलांनी याबाबत एक पत्र पुणे पोलिसांना पाठविले होते. त्यावर तातडीने कारवाई होण्याऐवजी तब्बल चार महिन्यांनंतर आता त्या पत्राची दखल घेतली गेली आहे. त्यामुळे केवळ कर्मचारीच नाही तर वरिष्ठ पोलीस अधिकारीही याकडे कसे दुर्लक्ष करतात, हे दिसून आले आहे.

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता विद्या विभुते यांनी पोलीस आयुक्तांना २२ जून २०२४ रोजी एक पत्र पाठविले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, पुणे शहर कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांमधील बाल लैंगिक अत्याचारासंबंधितचे गुन्ह्यातील रिमांड, जामीन अर्ज व केसेस या न्यायालयात चालवतात. या न्यायालयात जामीन अर्जावर म्हणणे देण्यासाठी संबंधित पोलीस ठाणे यांना कळविण्यात येते. परंतु, तपासी अधिकारी वारंवार सांगूनही मुदतीत म्हणणे तसेच पेपर दाखल करीत नाहीत. त्यामुळे सरकार पक्षातर्फे युक्तीवाद करण्याकामी अडचणी/ अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे कोर्ट तपासी अधिकारी यांच्या म्हणणेशिवाय आदेश पारीत करीत आहे.

या पत्रावर आता चार महिन्यांनंतर शहर पोलीस दलाकडून एक आदेश जारी करण्यात आला आहे.
सर्व परिमंडळ पोलीस उपायुक्त, सर्व सहायक पोलीस आयुक्त तसेच सर्व प्रभारी पोलीस निरीक्षक
यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी, अंमलदार यांना बाल लैंगिक अत्याचारासंबंधीचे गुन्ह्यातील मुदतीत म्हणणे/पेपर दाखल करण्याबाबत अवगत करावे, असा आदेश पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी काढला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

You may have missed