Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला दणका; सीबीआय सह राज्यसरकारला फटकारलं

Spreme Court-Rhea Chakraborty-Sushant Singh Rajput

मुंबई: Sushant Singh Rajput | अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने (CBI) अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिच्या कुटुंबियांच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावली होती. ही नोटीस रद्द करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या (Mumbai High Court) निकाला विरोधात सीबीआयसह सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.

दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत ही याचिका फेटाळून लावली. तसेच मुंबई हायकोर्टाचा निकालही कायम ठेवला. या सुनावणी दरम्यान कोर्टाने सरकारसह सीबीआयलाही खडसावलं आहे. रिया चक्रवर्ती या हायप्रोफाईल असल्याने हायकोर्टाच्या निकालाला आव्हान दिल्याचा ठपका कोर्टाने ठेवला.

सीबीआयने २०२० मध्ये रियासह भाऊ शोविक, आई संध्या आणि वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. सुप्रीम कोर्टाने आज (दि.२५) सरकार आणि सीबीआयला चांगलेच धारेवर धरले. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

दरम्यान कोर्टाने महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. आम्ही तुम्हाला ताकीद देत आहोत.
आरोपींमध्ये एक हायप्रोफाईल व्यक्ती असल्याने ही आव्हान याचिका दाखल केली आहे.
ही याचिका फेटाळली जाईल. दोन्ही व्यक्तींची पाळेमुळे समाजात खोलवर रुजली आहेत. तुम्हाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे कोर्टाने ठणकावले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्‍या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

You may have missed