Pune Water Supply | ऐन दिवाळीच्या तोंडावर हडपसर, मगरपट्टा भागातील पाणीपुरवठा ‘या‘ दिवशी राहणार बंद जाणून घ्या

Pune PMC Water Supply

पुणे: Pune Water Supply | ऐन दिवाळीत महापालिका प्रशासनाच्या चुकीमुळे पुणेकरांना पाणीटंचाई सहन करावी लागत आहे. मागील आठवड्यात शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत विषयक कामे करण्यासाठी पालिकेने गुरुवारी पूर्ण दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. (Pune Water Supply)

ज्या दिवशी पाणी बंद होते त्याच्या दुसऱ्या दिवशी कमी दाबाने आणि उशीरा पाणी पुरवठा होईल, असे पाणी पुरवठा विभागाने सांगितले होते. मात्र कमी दाबाने तर सोडाच दुसऱ्या दिवशी उशीरा देखील अनेक भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

सलग दोन दिवस पाणी न आल्याने पुणेकर नागरिक चांगलेच हवालदिल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातच आता महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पुन्हा एकदा उद्या (दि.२६) संपूर्ण दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्रातून रामटेकडीकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम महापालिकेच्या वतीने केले जाणार आहे. यासाठी शनिवारी हडपसर, मुंढवा, मगरपट्टा सिटी आणि आजूबाजूच्या परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

शनिवारी दिवसभर हा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.२७) या भागात उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, असे लष्कर पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

रामटेकडी, सय्यद नगर, हेवन पार्क, शंकर मठ, वैदुवाडी, संपूर्ण मुंढवा, मगरपट्टा, आकाशवाणी,
साडेसतरानळी, केशवनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळे नगर, ससाणे नगर,
काळेपडळ, शिंदे वस्ती, भीम नगर, मिलिंदनगर, भारत फोर्ज, महंमदवाडी गाव,
राजीव गांधीनगर, एन.आय.बी.एम. रोड, पोकळेमळा, हांडेवाडी रोड परिसर
या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Seized Gold Tempo | पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचे सोने जप्त;
टेम्पोत सोनं कुठून आलं,कुठं निघालं; डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्‍या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने;
नाकाबंदीत लागले हाताला (Video)

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

You may have missed