Pune Crime News | पार्सलला उशीर झाल्याने विचारणा केल्याने ग्राहकाला मालकाने केली मारहाण; पुन्हा हॉटेलमध्ये येऊ देऊ नको, अशी दिली धमकी
पुणे : Pune Crime News | चिकन सिक कबाब च्या पार्सलची ऑर्डर दिल्यानंतर अर्धा तास होऊन केल्यानंतरही ती न मिळाल्याने ग्राहकाने काऊंटरवर जाऊन चौकशी केली. तेव्हा इसको वापस हॉटेल मे मत आने दो, असे म्हणून हॉटेल मालकाने मारहाण (Marhan) करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याबाबत जाकीर हुसेन पठाण (वय ४०, रा. कोंढवा) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शहाबाज नवाब शेख (वय ४४, रा. रेडियन पॅराडाईज, वानवडी), मोहंमद अयाज शेख (वय २४, रा. मंचर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कॅम्पमधील शाही दावत हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री आठ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी शाही दावत हॉटेलमध्ये
चिकन सिक कबाब याचे पार्सलची ऑर्डर दिली होती.
पार्सल तयार होण्यास अर्धा तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेला होता.
तेव्हा त्यांनी हॉटेलच्या कर्मचार्याकडे विचारणा केली. हॉटेलचा मालक व काऊंटरवरील कर्मचारी यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली. ‘‘इसका क्या ऑर्डर है, जल्दी से देदे और इसको वापस हॉटेल मे मत आने दो,’’ असे म्हणून वाद घालून हाताने व कोणत्यातरी कठीण वस्तूने डोक्यात, मानेवर व कानावर मारहाण करुन जखमी केले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार
Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा