Sharad Pawar NCP | राष्ट्रवादी शरद पवार गटाची पाचवी उमेदवारी यादी जाहीर; पंढरपूरमधून अनिल सावंत, माढामधून अभिजीत पाटील तर मोहोळमधून राजू खरे निवडणुकीच्या रिंगणात
मुंबई: Sharad Pawar NCP | विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी, महायुती, तसेच इतर पक्षांकडूनही उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. (Sharad Pawar NCP)
आज (दि.२९) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ५ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या पाच जागांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आतापर्यंत ८७ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
शरद पवार गटाच्या पाचव्या यादीमध्ये माढा मधून अभिजीत पाटील, मुलुंड मधून संगिता वाजे, मोर्शीमधून गिरीश कराळे, पंढरपूरमधून अनिल सावंत तर मोहोळ मधून राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पंढरपूरमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाने तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत
यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे.
त्यामुळे आता पंढरपूर मध्ये महाविकास आघाडीत मैत्रिपूर्ण लढत होणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा