Pimpri Chinchwad Crime Branch News | औद्योगिक परिसरात गांजाची तस्करी करणारी महिला जाळ्यात; 18 किलो गांजासह 9 लाख 41 हजारांचा माल जप्त
पिंपरी : Pimpri Chinchwad Crime Branch News | अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण औद्योगिक परिसरात गांजाची तस्करी करणार्या महिलेला अटक करुन तिच्या ताब्यातून तब्बल १८ किलो गांजासह ९ लाख ४१ हजार रुपयांचा माल जप्त केला. (Ganja Case)
सोनाली सुनिल मोहिते (वय २५, रा. शनिमंदिरासमोर, चाकण, ता. खेड) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने विशाल मोहिते (रा. पांगरी, ता. खेड) आणि मयुर रासकर (रा. शिक्रापूर) यांच्याकडून हा गांजा आणला असल्याचे सांगितल्याने त्या दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri Chinchwad Crime Branch News)
याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (Anti Narcotics Cell Pimpri) पोलीस अंमलदार विजय दीपक दौंडकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील सहायक पोलीस निरीक्षक सचिन कदम, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार राजेंद्र बांबळे, शिल्पा कांबळे, विजय दौंडकर, निखिल शेटे, सदानंद रुद्राक्षे, निखिल वर्पे हे चाकण परिसरात पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार विजय दौंडकर व निखिल वर्पे यांना माहिती मिळाली की, मेदनकरवाडी गावाच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गावरील बंगा टायर्स अँड बॅटरी दुकानासमोरील घरात एक महिला गांजा विक्री करीत असते. या माहिती नुसार पोलिसांनी सोनाली मोहिते हिच्या घरावर धाड घातली. त्यात १८ किलो ६२४ ग्रॅम गांजा व १ मोबाईल असा ९ लाख ४१ हजार २०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक बोरकर अधिक तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा