Sharad Pawar On Ajit Pawar | ‘पहाटे उठले शपथ घेतली, राज्यपालांना झोपेतून उठवले’, शरद पवारांची अजित पवारांवर जहरी टीका; म्हणाले – ‘अनेकांना मंत्री, उपमुख्यमंत्री केलं पण एक पद स्वतःच्या मुलीला दिलं नाही’

Sharad-Pawar-Ajit-pawar

बारामती: Sharad Pawar On Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान आज कण्हेरी गावातून नारळ फोडत प्रचाराला सुरुवात करण्यात आली. (Baramati Assembly Election 2024)

दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. “माझ्या हातात सत्ता होती अनेक पद द्यायचा अधिकार माझ्याकडे होता, तुम्हाला पदं दिली. एक पद स्वतःच्या मुलीला दिलं नाही”, म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना लक्ष्य केले.

शरद पवार म्हणाले, “एकाने शेती करून दुसऱ्याने नोकरी करावी असे माझे धोरण आहे. म्हणून आम्ही अनेक कारखाने उभारले. ही मलिदा गँग काय भानगड आहे मला माहिती नाही. आम्ही अशी गँग काय बनवली नाही. मनमोहन सिंग यांनी बारामती पॅटर्न हा शब्द वापरला होता. राज्य चालवायची जबाबदारी मी तरुण पिढीवर दिली आहे.

राजकारणात कधी यश असतं कधी अपयश असतं. पण सहकाऱ्यांची साथ सोडायची नसते. सत्ता नसताना आमच्या सहकाऱ्यांनी उद्योग केला, पहाटे उठले आणि शपथ घेतली. त्या राज्यपालांना झोपेतून उठवले. याचा परिणाम काय झाला? चार दिवस टिकलं, ही गोष्ट करणे योग्य नाही. इथलं काम ज्यांच्या हातात दिलं त्यांनी पक्ष घेतला आणि दुसरीकडे जाऊन बसले. “

ते पुढे म्हणाले, ” मी त्यांच्या म्हणण्याविरोधात कधी भूमिका घेतली नाही. माझ्या हातात सत्ता होती अनेक पद द्यायचा अधिकार माझ्याकडे होता, तुम्हाला मंत्री केलं, अनेकांना मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं एक पद स्वतःच्या मुलीला दिलं नाही. घर एकत्र ठेवलं पाहिजे, सगळे अधिकार त्यांना दिले होते. राज्यात गेले अनेक वर्ष आम्ही लोकांनी पक्ष काढला. तुम्ही लोकांनी साथ दिली. ४ वर्षे उपमुख्यमंत्री बनवलं. अनेक वर्ष निवडून गेले.

तसंच, ‘राष्ट्रवादी पक्ष कोणी काढला? मी. चिन्ह कोणाचं होतं? काही लोकांनी आमच्यावर खटला केला.
हे चिन्ह त्यांचं नाही आमचं आहे असा खटला केला. कोर्टात तुम्ही हजर रहा असे समन्स माझ्या नावाने काढलं.
मी कधी समन्स पाहिला नव्हता. उभ्या आयुष्यात कधी कोर्टात गेलो नाही.

ती केस करून मला खेचलं गेलं. कोर्टाने निर्णय दिला पक्ष आणि चिन्ह त्यांना दिलं.
पक्ष पळवला, चिन्ह पळवलं. आज बारामतीचा विकास सांगितला जातो.
त्यात अजितदादांचा हात असेल. विकासात विरोधकांचा हात असेल तरी त्यांचं नाव घ्यायलाच पाहिजे”,
असा खोचक टोलाही शरद पवार यांनी अजित पवारांना लगावला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Purandar Assembly Election 2024 | पुरंदर मतदारसंघात काँग्रेसची पुनरावृत्ती की विजय शिवतारे गड जिंकणार? राजकीय वर्तुळात चर्चा

Nirbhay Bano Campaigns | ‘निर्भय बनो’च्या सभा आता विधानसभेलाही होणार; मविआला सशर्त पाठिंबा; असीम सरोदे म्हणाले,”लाडकी नव्हे धाडसी बहीण योजना हवी”

Mantarwadi Pune Fire News | मंतरवाडीतील पेंटच्या गोडावूनला मध्यरात्री भीषण आग ! दोन टेम्पो, दोन दुचाकी ही आगीच्या भक्ष्यस्थानी (Video)