Pune Crime News | एकाच दिवसात तीन तडीपार गुंड जाळ्यात ! कोयते, तलवारी बाळगणारे गुंड जेरबंद
पुणे : Pune Crime News | आपल्या परीसरात दहशत निर्माण करणार्या गुंडांना पोलीस एक ते दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करतात. परंतु, हे गुंड काही दिवसात परत आपल्या घरी येऊन राहून दंगा करीत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. तडीपारीचा भंग करुन शहरात येऊन राहणार्या तीन तडीपार गुंडांना पोलिसांनी एकाच दिवसात पकडल्याचे समोर आले आहे. (Tadipar Criminal Arrested)
मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) आतिश सुरज बाटुंगे (वय २५, रा. गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा) या तडीपार गुंडाला अटक केली आहे. आतिश बाटुंगे याला १२ ऑगस्ट २०२४ पासून २ वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तो केशवनगर येथील ओम साई चौकात पोलिसांना मंगळवारी रात्री आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या कंबरेला कोयता मिळला आहे. पोलीस हवालदार साळुंखे अधिक तपास करीत आहेत.
सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police) धीरज रंगनाथ आरडे (वय २८, रा. तळजाई वसाहत) हा तडीपार गुंड तडीपारीचा भंग करुन शहरात आलेला आढळून आला. धीरज आरडे याला ६ जून २०२३ पासून २ वर्षांकरीता तडीपार केले आहे. असे असतानाही तळजाई वसाहत येडेश्वरी मंदिराजवळ सोमवारी रात्री साडेदहा वाजता आढळून आला.
समर्थ पोलिसांनी (Samrath Police) मयुर दत्तात्रय थोरात (वय २५, रा. डोके तालीम मागे, नाना पेठ) या तडीपार गुंडाला अटक केली. मयुर थोरात याला २ वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. असे असतानाही या तडीपारीचा भंग करुन मयुर थोरात हा आपल्या घरी रहात असल्याचे आढळून आले.
खडकी पोलिसांनी (Khadki Police) जय शशिकांत गायकवाड (वय १९, रा. पड्याळ वस्ती, खडकी)
याला लोखंडी कोयता जवळ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
दोन तलवारी, दोन कोयते जवळ बाळगणार्या अथर्व अनिल आवळे
(वय १९, रा. लक्ष्मी विहार बिल्डिंग, हिंगणे खुर्द) याला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे.
येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) १० हजार ४०० रुपयांचा ५२० ग्रॅम गांजा
बाळगणार्या गोरक्ष कचरु जगताप (वय २५, रा. गाडीतळ, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत
Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा