Pimpri Chinchwad Police MCOCA Action | विष्णु पवार टोळी, राजू देशमुख टोळी, बाळासाहेब बांगर टोळी, सुरज रणदिवे टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई

IPS Vinoy Kumar Choubey

या वर्षात ३० संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील १७५ गुन्हेगारावर कारवाई

पिंपरी : Pimpri Chinchwad Police MCOCA Action | आगामी विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) या भयमुक्त व पारदर्शक आणि नि:पक्षपातीपणे पार पाडता यावी, यासाठी व्यापक प्रतिबंध कारवाई आराखडा पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी तयार केला आहे. त्यानुसार पोलिसांनी चार टोळ्यांमधील ३३ गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे. २०२४ या वर्षात आतापर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील ३० संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण १७५ गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यातील (Hinjewadi Police) गुन्ह्यामध्ये विष्णु दिगंबर पवार (टोळी प्रमुख) (रा. मातोश्री हॉस्पिटलमागे, वडगाव मावळ), करण राहुल लोखंडे (वय १९, रा. वाकड) व इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या टोळीवर एकूण ९ गुन्ह्यांची नोंद आढळून आली आहे.

सांगवी पोलीस ठाण्यामधील (Sangvi Police) राजू बापुराव देशमुख (टोळी प्रमुख) (वय २१, रा. संतकृपा कॉम्प्लेक्स, बालेवाडी गावठाण, बाणेर), शेखर संपत देशमुख (वय २६, रा. बाणेर), स्वप्नील वाल्मिकी कांबळे (वय २०, रा. बाणेर), हनुमान टिपन्ना राठोड (वय २१, रा. विरभद्रनगर, बाणेर), विनोद वाल्मिक कांबळे (वय २०, रा. बाणेर), दत्ता दादा कांबळे (वय २३, रा. भेगडेनगर, पाषाण) यांच्यावर एकूण ९ गुन्हे केल्याची नोंद आढळून आली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police) बाळासाहेब बळीराम बांगर (टोळी प्रमुख) (वय २९, रा. चाकण), प्रविण दत्तात्रय भालेराव (वय २८, रा. आणदेशे, ता. मावळ), अशोक गणेश शिरोळे (वय २५, रा. मोशी) या टोळीवर एकूण ९ गंभीर गुन्ह्यांची नोद आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सुरज प्रकाश रणदिवे (टोळी प्रमुख)(रा. घरकुल चिखली), विवेक विनोद नाईक ऊर्फ सोन्या (वय २०, रा. भोसरी), सौरभ कानिफनाथ भोपळे (वय २०, रा. भोसरी), अथर्व उदय पकाले (वय २०, रा. खंडे वस्ती, भोसरी), प्रतिक ज्ञानेश्वर सपकाळ (वय २८, रा. वाकड), लकी ऊर्फ लखन ऊर्फ सुनिल रामभाऊ पवार (वय २४, रा. वाकड), चेप्या ऊर्फ केतन गणेश सोनवणे (वय २६, रा. मिलिंदनगर, पिंपरी) व इतर एक यांच्याविरुद्ध ४ गुन्हे केल्याची नोंद आढळून आली आहे.

या चारही टोळ्यांनी स्वत:ची संघटित टोळी तयार करुन हिंजवडी, तळेगाव दाभाडे, वाकड, चिखली, चाकण, एमआयडीसी भोसरी, चिंचवड, निगडी, सांगवी, चतु:श्रृंगी, दत्तवाडी, कोथरुड, वडगाव मावळ, पौड, घोडेगाव या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुन, खुनचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, पळून नेऊन बलात्कारणे, खंडणी मागणे, दरोडा, अपहरण करणे, असे गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, पोलीस उपायुक्त डॉ. विशाल गायकवाड, स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कर्‍हैया थोरात, महेश बनसोडे, गणेश जामदार, अनिल देवडे,, सहायक फौजदार सचिन चव्हाण, हवालदार व्यंकप्पा कारभारी, विनोद साळवे, पोलीस अंमलदार निलेश अरगडे, पुष्पांजली आहेर, शरद उभे यांच्या पथकाने केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत

Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा