Supriya Sule On Devendra Fadnavis | आर.आर पाटलांबाबत अजित पवारांनी केलेल्या आरोपावर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या – ‘मग 70 हजार कोटींचा घोटाळा झाला की नाही हे फडणवीसांनी सांगायला पाहिजे’
बारामती: Supriya Sule On Devendra Fadnavis | तासगाव-कवठे महांकाळ (Tasgaon Assembly Election 2024) येथील एका प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माजी गृहमंत्री आर. आर पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. सिंचन घोटाळ्याचा आरोपानंतर माझी खुली चौकशी करण्याच्या आदेशावर तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी स्वाक्षरी केली होती. त्याबाबत मला माहिती नव्हतं. ती सही मला फडणवीसांनी दाखवली, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. या आरोपाला आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” अजित पवार यांनी आर आर पाटील यांच्याबाबत केलेले वक्तव्य वेदनादायी होतं. याबाबत मी त्यांच्या कुटुंबियांना फोन करुन माफी मागितली. आमचे अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध आहेत. गेलेल्या माणसाबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. राजकारण या पातळीवर गेले आहे का हे ऐकून वाईट वाटलं.
७० हजार कोटींचा आरोप झाला तेव्हा आमचा पक्ष एक होता. आम्ही सगळेच एकत्र काम केलं, या घोटाळ्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. याची चौकशी झाली पाहिजे ही मागणी फडणवीस यांनी केली हे महाराष्ट्राने पाहिलं.
आर.आर पाटील यांना मानलं पाहिजे, विरोधी पक्षांनी जेव्हा घोटाळ्याचा आरोप केला तेव्हा चौकशी राज्याच्या हिताची झाली पाहिजे असं वाटलं असेल. ज्याला कर नाही त्याला डर कशाला. इनामदार व्यक्ती म्हणून आर आर पाटील यांनी सही केली असेल. आता या घोटाळ्यात काही होतं की नव्हतं हे सांगायला पाहिजे”, अशी मागणीही सुळे यांनी केली.
त्या पुढे म्हणाल्या,” जेव्हा तुम्ही मंत्री होता तेव्हा गोपनीयतेची शपथ घेता. शपथेत फाईल दाखवायची मुभा नसते मग फडणवीसांनी अजित पवारांना फाईल कशी दाखवली? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे.
आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले, त्यामुळे या सगळ्याचं उत्तर फडणवीस यांना द्यावं लागेल. ७० हजार कोटींचा घोटाळा झाला की नाही झाला हे सांगायला पाहिजे. आमचा पक्ष एक होता, त्या काळात अजित पवार यांच्या मागे पक्ष ताकदीने उभा होता”, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगतलं.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी
Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत
Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा