Pune Crime News | सराईत मोबाईल चोरट्यांकडून 12 मोबाईल हस्तगत; खडक पोलिसांची कामगिरी

Khadak Police

पुणे : Pune Crime News | रस्त्यावरुन जाणार्‍या लोकांच्या हातातून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून (Mobile Theft Cases) चोरुन नेणार्‍या टोळीला खडक पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांकडून १२ मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस आणल्या आहेत. (Arrest In Robbery Case)

गोविंद सुभाष सूर्यवंशी (वय १८, रा. ईमाननगर, कोंढवा), अजय माणिक रसाळ (वय २५, रा. आंबेडकरनगर, कोंढवा) आणि राहुल महादेव गेजगे (वय १८, रा. पाटील वस्ती, येवलेवाडी, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुणे शहरात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. खडक पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार भोसले व खराडे यांना त्यांचे बातमीदारांकडून माहिती मिळाली की, मोबाईल हिसकावून नेणार्‍या चोरटे साठे कॉलनीजवळील सुशील लॉज येथे थांबले आहेत. या माहितीची खातरजमा करण्यासाठी तातडीने पोलीस पथक रवाना झाले. त्यांनी तेथे असलेल्या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्या ताब्यातील मोबाईल मालकाबाबत विचारपूस केल्यावर ते विसंगत माहिती देऊ लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणून आपल्या पद्धतीचे चौकशी केली. त्यावर त्यांनी गेल्या २ महिन्यांपासून खडक पोलीस ठाण्याच्या परिसरात विविध ठिकाणाहून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख ६४ हजार रुपयांचे १२ मोबाईल हस्तगत केले आहेत. त्याचे खडक पोलीस ठाण्यातील ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

या कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा,
अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल,
सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण,
गुन्हे निरीक्षक राहुल गौड, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे,
पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, प्रमोद भोसले,
शेखर खराडे, अक्षयकुमार वाबळे, कृष्णा गायकवाड, लखन ढावरे, इरफान नदाफ,
मयुर काळे, संतोष बारगजे, उमेश मठपती, विश्वजीत गोरे, शोऐब शेख कविता जाधव यांच्या पथकाने केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | निवडणुकीच्या तोंडावर निलेश लंकेंकडून अजित पवारांना धक्का; उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांनी घड्याळ सोडत हाती घेतली तुतारी

Raj Thackeray On Eknath Shinde-Ajit Pawar | ‘पक्षाचे नाव व चिन्ह घेणं योग्य नाही’, सत्तासंघर्षांवरून राज ठाकरेंचा शिंदेंसह अजित पवारांना टोला; म्हणाले…

Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत

Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा

You may have missed