Maharashtra Assembly Election 2024 | नावात काय आहे? नव्हे नावातच सर्व काही…; नावाचे साधर्म्य असल्याने अनेक उमेदवारांना निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता
पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | नावात काय आहे?, असे विल्यम शेक्सपियरने म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात नावातच सर्व काही आहे, याचा अनुभव विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात असणाऱ्या उमेदवारांना येत आहे. नावाचे साधर्म्य असल्याने निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता अनेक मतदारसंघात आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातील (Dindori Lok Sabha) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांच्याशी नाम साधर्म्य असलेल्या दुसऱ्या भास्कर भगरे यांनी अर्ज दाखल केला होता, उल्लेखनीय बाब म्हणजे या दुसऱ्या भास्कर भगरेंना सुमारे लाखभर मते मिळाली होती. त्यामुळे याची राज्यभरात चर्चा झाली होती. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत नावाचे साधर्म्य असल्याने अनेक उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातील (Nandgaon Assembly Election 2024) शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) विद्यमान आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या विरोधात सुहास कांदे नावाचा दुसरा उमेदवार रिंगणात उतरला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुहास कांदे यांचे वांदे करण्यासाठी दुसऱ्या सुहास कांदेंना रिंगणात उतरवण्यात आल्याची चर्चा आहे.
नाशिक पूर्व मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते (Ganesh Gite) यांच्याशी नाव साधर्म्य असलेल्या दुसऱ्या गणेश गीते यांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) उमेदवार वसंत गीते (Vasant Gite) यांच्या विरोधात दुसरे वसंत गीते रिंगणात उतरले आहेत.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघात (Koregaon Assembly Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्याशी नाम साधर्म्य असलेल्या एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) आणि शशिकांत शिंदे यांच्यात लढत होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मतदारसंघातील (Dapoli Assembly) शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्याशी नाव साधर्म्य असलेल्या दुसऱ्या योगेश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असलेल्या संजय कदम (Sanjay Kadam) यांच्याशी नाव साधर्म्य असलेल्या आणखी दोन संजय कदम या उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केलेत. त्यामुळे दापोली मतदारसंघात त्याचा कितपत फटका खऱ्या अधिकृत उमेदवारांना बसतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात (Parvati Assembly Election 2024) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अधिकृत उमेदवार अश्विनी नितीन कदम (Ashwini Nitin Kadam) यांच्या नावाला साधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर अश्विनी अनिल कदम नावाने एक उमेदवार रिंगणात आहे.
वडगाव शेरी विधानसभा (Vadgaon Sheri Assembly) मतदारसंघात तुतारी (Tutari) चिन्हावर बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) हे उमेदवार असताना वडगांव शेरी मतदारसंघातून अजून एका बापू बबन पठारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने वडगांव शेरी मतदारसंघात दोन बापू पठारे झाले आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवार बापू बबन पठारे यांवर शरद पवारांच्या पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी
Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत
Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा