Pune Crime News | ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमधील बंदुक दिवाळीतील फटाके उडविण्याची; लोकांमध्ये भ्रम निर्माण करणाऱ्या दोघांना अटक (Video)

पुणे : Pune Crime News | बंदुक घेऊन रोडवरुन दुचाकीवरुन जाणार्या दोघांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यात तो काही वाहनचालकांवर ती बंदुक रोखत असल्याचे दिसत होते. सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) या दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. दिवाळीतील फटाके उडविण्याची बंदुक खरी असल्याचे भासवून लोकांमध्ये भ्रम निर्माण करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
https://www.instagram.com/p/DByg4NvJ2jU
अक्षय अंकुश गायकवाड Akshay Ankush Gaikwad (वय २७, रा. शिवणे), सुनील चंद्रकांत शिंदे Sunil Chandrakant Shinde (वय २८, रा. वारजे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही पेंटर असून पेंटिंगची कामे करतात.
कात्रज – देहुरोड बायपास रोडवरील (Katraj Dehu Road Bypass Road) वडगाव पूल ते वारजे पूल (Vadgaon Bridge To Warje Bridge) दरम्यान दुचाकीवरुन दोघे जण जात होते. त्यातील मागे बसलेल्याने हातात बंदुक घेतली होती. ती तो सर्वांना दाखवत होता. एका कारला डाव्या बाजूने ओव्हरटेक करताना त्यांच्यावर ती रोखलेली दिसत होती. त्यांच्या मागे असलेल्या कोणीतरी त्यांचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकला. तो खूप व्हायरल झाला. दिवाळीसारख्या सणामध्ये भर दिवसा गुंड हातात बंदुक घेऊन रस्त्यावर बिनधास्त फिरत असल्याचे या व्हिडिओमुळे प्रतीत होत होते.
याबाबत सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर (Sr PI Raghavendra Kshirsagar)
यांनी सांगितले की, या व्हायरल व्हिडिओवरुन आम्ही दुचाकीस्वारांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.
दिवाळीतील फटाके वाजविणारी बंदुक त्यांच्याकडे होती. त्यांच्या या कृत्यामुळे लोकांमध्ये भिती निर्माण झाली
आणि दहशतीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याने त्यांना अटक केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा