Pune PMC News | पुणे महापालिकेच्या नोकरीचा 71 कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा; नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

पुणे: Pune PMC News | मागील वर्षभरात पालिकेच्या ७१ कर्मचाऱ्यांनी नोकरीला रामराम ठोकला आहे. पालिकेतील नोकरभरतीचा वाद न्यायालयात असल्याने, तसेच पालिकेची सेवा प्रवेश नियमावलीला अंतिम मान्यता न मिळाल्याने गेली १० ते १२ वर्षे पालिकेत कोणत्याही पदावर भरती झालेली नव्हती. गेल्या दहा ते बारा वर्षांमध्ये पालिकेतून अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले. मात्र, भरती प्रक्रियेवर बंदी असल्याने पालिकेने कंत्राटी पद्धतीने पदे भरून कामे सुरू ठेवली होती. (Pune Municipal Corporation-PMC)
२०२२ मध्ये राज्यसरकारने भरती प्रक्रियेवर बंदी उठल्यानंतर महापालिकेने १३५ कनिष्ठ अभियंत्यांसह विविध पदांसाठी ४४८ जणांची भरती प्रक्रिया राबविली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३२० जागांची भरती प्रक्रिया पूर्ण केली. या दोन टप्प्यांत आत्तापर्यंत पालिकेने सुमारे ८०८ पदांची भरती केली आहे.
लिपिक – ३७, कनिष्ठ अभियंता – १०, सहायक अतिक्रमण निरीक्षक – ९, फायरमन – ८, विभागीय वैद्यकीय अधिकारी – ३, औषध निर्माता – २,वाहन निरीक्षक – २ अशा ७१ जणांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या जागा रिक्त झाल्या आहेत.
पालिकेत काम करताना होणारा त्रास, माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधींकडून टाकला जाणारा दबाव, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा मानसिक त्रास यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे कारण पुढे करून राजीनामे देण्यात आल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे.
मात्र, हे कर्मचारी स्पर्धा परीक्षा देऊन पालिकेच्या सेवेत दाखल झाले होते. त्यांना इतर काही ठिकाणांवरून पालिकेपेक्षा अधिक चांगल्या प्रकारची नोकरीची संधी मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिला असल्याचे पालिकेच्या प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा