Maharashtra Assembly Election 2024 | सोलापूर विधानसभेचा आखाडा चर्चेत; मोदी, शहा, पवार, गांधींसह तेलगू अभिनेते मैदान गाजवणार

Vidhansabha

सोलापूर: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रचाराचे नियोजन महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) करण्यात येत आहे. २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. त्यामुळे आता प्रचारासाठी कमी दिवस राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराची धामधूम सुरु आहे.

सोलापुरात सहा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यात सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर-मंगळवेढा आणि माळशिरस या मतदारसंघांचा समावेश आहे. (Solapur Politics News)

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हैदराबादच्या माधवी लता, तेलंगणाचे कट्टर हिंदुत्वादी आमदार टी राजा सिंह यांच्या सभा होणार आहेत.

तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या सभा होणार आहेत. याशिवाय हिंदी आणि तेलुगू अभिनेत्यांच्या सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे ऍड. यू. एन. बेरिया यांनी सांगितले. दरम्यान मविआ कडून तेलगू भाषिकांची संख्या लक्षात घेता तेलगू अभिनेत्यांच्या सभांची मागणीही सोलापूरमध्ये होत आहे.

सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख, सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सोलापुरात सभा होणार आहे.

पंढरपूर मंगळवेढा आणि माळशिरसच्या उमेदवारांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांचे नियोजन आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून सोलापूरमधील भाजपचे स्थानिक नेते प्रयत्न करत आहेत.

नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जनसेना पक्षप्रमुख अभिनेते पवन कल्याण यांच्याही सभांचे नियोजन आहे, असेही भाजपचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yerawada Pune Crime News | पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने बंदुकीतून गोळीबार करुन केले जखमी; येरवड्यातील घटना (Video)

PI Girish Sonawane | निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकरच्या 500 कोटींच्या बेहिशोबी मालमत्ताबाबत सर्वोत्कृष्ट तपासाचे केंद्रीय गृहमंत्री दक्षता सुवर्ण पदक पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे यांना जाहीर

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात वाढतोय तरुणाईचा कल ! बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत तरुणांचा पक्ष प्रवेश

You may have missed