Pune Crime News | भागीदारीतील कंपनीतून मेटरियल घेऊन स्वत:च्या कंपन्यांमार्फत विक्री करुन 2 कोटी 31 लाखांची फसवणूक

fraud

पुणे : Pune Crime News | भागीदारी कंपनीतून मेटरियल घेऊन स्वत:च्या कंपन्यांमार्फत त्याची विक्री करुन २ कोटी ३१ लाख २० हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) करण्याचा प्रकार समोर आला असून पोलिसांनी पतीपत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत चारुदत्त श्रीनिवास मुदगल (वय ५८, रा. ईडन गार्डन, पीवायसी कॉलनी, डेक्कन जिमखाना) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deecan Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन निलेश सुरेश ठोले Nilesh Suresh Thole (वय ४९) आणि रिना निलेश ठोले Rina Nilesh Thole (रा. प्रणव सोसायटी, फाटक बाग, नवी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एमब्लेम डिजिटल (Emblem Digital) या प्रभात रोडवरील (Prabhat Road Pune) कंपनीत २०१९ ते आतापर्यंत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे १५ वर्षांपासून मटेरियल सप्लाय करीत आहेत. त्यातून आरोपी निलेश ठोले याच्याशी ओळख झाली. त्यांनी भागीदारीत गुरुकृपा स्पेशालिटी फिल्मस हा व्यवसाय सुरु केला. हा व्यवसाय तोट्यामध्ये चालू असल्याचे निलेश ठोले यांनी सांगितले. फिर्यादी यांनी अधिक माहिती घेतली असता निलेश याने गुरुकृपा स्पेशालिटी फिल्मसच्या कॅश क्रेडिट अकाऊंटमधून मटेरियल खरेदी केले.

ते मटेरियल त्याच्या श्री वल्लभ डिजिटल प्रा. लि. पुणे, श्री वल्लभ एन्टरप्रायजेस, भोपाळ,
श्री वल्लभ एन्टरप्रायजेस पुणे या स्वत:चे कंपन्यांमध्ये सुमारे चार ते साडे चार कोटींचे मटेरियल दिले.
या मटेरियलची विक्री स्वत:चे तीन कंपन्यांमधून करुन विक्रीचे पैसे स्वत:चे कंपनीकरीता वापरले
असून फिर्यादीची ४ कोटी ८३ लाख २३ हजार २९३ रुपयांची फसवणूक झाली,
असे फिर्यादीत म्हटले होते. याबाबत प्राथमिक चौकशी गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने केली.
त्यात २ कोटी ३१ लाख २० हजार ४५५ रुपयांची आरोपीने फसवणूक केल्याचे दिसून आले आहे.
डेक्कन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yerawada Pune Crime News | पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने बंदुकीतून गोळीबार करुन केले जखमी; येरवड्यातील घटना (Video)

PI Girish Sonawane | निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकरच्या 500 कोटींच्या बेहिशोबी मालमत्ताबाबत सर्वोत्कृष्ट तपासाचे केंद्रीय गृहमंत्री दक्षता सुवर्ण पदक पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे यांना जाहीर

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात वाढतोय तरुणाईचा कल ! बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत तरुणांचा पक्ष प्रवेश

You may have missed