Lohegaon Pune Crime News | पैसे दिले असतानाही लाईट बील न भरल्याने वडिल, भावाने लाकडी दांडक्याने डोक्यात मारुन केले जखमी
पुणे : Lohegaon Pune Crime News | लाईट बील भरण्यासाठी पैसे दिले असतानाही लाईट बील न भरल्याने भावाभावांमध्ये झालेल्या भांडणात वडिल आणि मोठ्या भावाने लाकडी दांडक्याने लहान भावाच्या डोक्यात मारहाण (Marhan) करुन जखमी केल्याचा प्रकार लोहगावात घडला आहे. (Lohegaon Pune Crime News)
याबाबत बाळु बबन काळे (वय ३१, रा. ब्ल्यु स्काय पार्क योजनानगरच्या पाठीमागे, लोहगाव -वाघोली रोड) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police) फिर्याद दिली आहे़. त्यानुसार पोलिसांनी त्यांचे वडिल बबन आर काळे (वय ६५) आणि भाऊ गरिबा बबन काळे (वय ४५, दोघे रा. वाघोली – लोहगाव रोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना फिर्यादीच्या घरी ३० ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे भाऊ असून एकत्र राहतात. वडिल व मोठ्या भावाने पैसे देऊन बाळु याला लाईट बील भरण्यास सांगितले होते. परंतु, बाळु याने लाईटबिल भरले नाही. रात्री वडिलांनी बाळुला दिलेल्या पैशातून लाईट बील का भरले नाही, असे विचारले. यावरुन त्यांच्यात वाद झाला.
तेव्हा मोठा भाऊ गरिबा याने बाळु याला खाली पडून हाताने मारहाण केली.
वडिलांनी शिवीगाळ करुन त्यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारले. त्यामुळे फिर्यादी हे जखमी झाले.
घरासमोर असलेल्या फिर्यादीच्या दुचाकीचे मडगार्ड, हेडलाईट फोडून नुकसान केले.
पोलीस हवालदार धेंडे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा