Prakash Ambedkar On OBC Reservation | ‘विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार’, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होणार’

Prakash Ambedkar

पुणे: Prakash Ambedkar On OBC Reservation | विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सर्वच पक्षांनी सुरु केलेली आहे. केवळ पंधरा दिवसांवर निवडणूका आल्या असून जोरदार तयारी केली जात आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी दोन्हीही शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यानंतर त्यांची आता प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

फेसबुकवरती एक व्हिडिओ पोस्ट करत प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला आवाहन केले आहे. ते म्हणाले, ” ‘मी सध्या आयसीयूमध्ये आहे. माझ्यावर अँजिओप्लास्टी आणि एन्जिओग्राफी झालेली आहे. डॉक्टरांनी अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे. विधानसभा निवडणुकीची सुरुवात झाली आहे. ही निवडणूक महत्त्वाची आहे. ओबीसीसाठी सुद्धा ही निवडणूक महत्त्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसींचं आरक्षण थांबवलं जाणार आहे.”

ते पुढे म्हणाले, “एसटी, ओबीसी आरक्षण वाचविण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे. एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होणार आहे. या निवडणुकीत आपली सगळ्यांची जबाबदारी महत्वाची आहे. विधानसभेत आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येतो. आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा”, असे भाष्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवणं शिवसेना शिंदे गटाच्या अंगलट, चौकशी होणार; शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Baramati Assembly Election 2024 | ‘तीन ठिकाणांवरून ऑफर होती, यंदा बारामतीतून उभा राहणार नव्हतो’, अजित पवारांचे वक्तव्य

Pune Crime News | भागीदारीतील कंपनीतून मेटरियल घेऊन स्वत:च्या कंपन्यांमार्फत विक्री करुन 2 कोटी 31 लाखांची फसवणूक

You may have missed