Mangalwar Peth Pune Crime News | पुणे: तडीपार केलेल्या गुंडांनी मंगळवार पेठेत कोयते घेऊन घातला राडा; आम्हीच इथले डॉन, म्हणत घातला गोंधळ

marhan

पुणे: Mangalwar Peth Pune Crime News | तडीपार केले असतानाही शहरात येऊन साथीदारासह मंगळवार पेठेत कोयते (Koyta) उगारुन मोठ मोठ्याने ओरडून आम्ही इथले डॉन असून आमच्या नादाला कोणी लागले तर सोडणार नाही,अशी धमकी देऊन गोंधळ घातला.

प्रतिक विजय माने (वय २३, रा. कुंजीर वस्ती, मांजरी) आणि आकाश ज्ञानेश्वर तानवडे (वय २३, रा. जहांगीर नगर, मुंढवा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलीस अंमलदार चेतन दत्तात्रय होळकर यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवार पेठेतील भिमनगर कमानजवळ गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक विजय माने हा सराईत गुंड आहे. त्याच्या वाढत्या गुंडगिरीमुळे त्याला पोलीस उपायुक्त आर राजा यांनी १३एप्रिल २०२४ पासून पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून दोन वर्षांपासून तडीपार केले आहे. तरीही तो तडीपारी आदेशाचा भंग करुन पुणे शहरात आला. आपला साथीदार आकाश तानवडे याच्याबरोबर टारसायकलवरुन हातात कोयता घेऊन मोठ मोठ्याने ओरडत रात्री साडेअकरा वाजता मंगळवार पेठेतील भिमनगर कमान येथे आला.

त्याने मोठमोठ्याने ओरडून “आम्ही इथले डॉन असून आमच्या नादाला कोणी लागले तर त्याला सोडणार नाही,” अशी धमकी देऊन परिसरात दहशत पसरविली. पोलिसांनी दोघांना पकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जवळगी तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Politics | शायना एनसी प्रकरणी शरद पवारांकडून अरविंद सावंत यांची पाठराखण; म्हणाले – ‘अरविंद सावंत यांचं वक्तव्य वैयक्तिक हल्ला होत नाही’

Sharad Pawar News | ‘सत्तेसाठी आमचा पक्ष, चिन्ह आणि सर्व हिसकावण्याचा प्रयत्न’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – ‘सन 1980 ची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही’



You may have missed