Pune Crime News | पुणे: जबरदस्तीने गळ्यात मंगळसुत्र घालून केला अत्याचार ! बहिणीच्या इन्स्टाग्रामवर अश्लिल फोटो पाठवून केली बदनामी

Rape-Case-Instagram

पुणे : Pune Crime News | प्रवासात झालेली ओळख वाढून इन्स्टाग्रामद्वारे ते जवळ आले. त्याने केलेल्या प्रपोजला तिने नकार दिला. तेव्हा त्याने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन त्यावरुन तिची बदनामी केली. तिच्या गळ्यात जबरदस्तीने मंगळसुत्र टाकून तिच्यावर वारंवार अत्याचार (Rape Case) केला. ती त्याच्याकडे जाण्यास तयार नसताना तिच्या बहिणीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अश्लिल फोटो पाठवून तिची बदनामी केली. (Pune Crime News)

याबाबत एका १९ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका तरुणावर पोक्सोसहीत विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२२ पासून १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपींची ट्रव्हल्समध्ये ओळख झाली. आरोपीने इन्स्टाग्रामवरुन ओळख वाढविली. २ महिन्यांनंतर तिला प्रपोज केले. परंतु त्याला तिने नकार दिला. त्यानंतर आरोपीने इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करुन त्याच्यावर ३०० रुपयांमध्ये नाईट फुल असे लिहून त्यावर फिर्यादीचा मोबाईल नंबर टाकून फिर्यादीची बदनामी केली. फिर्यादीकडे ५ हजार रुपयांची मागणी करु लागला.

तिला घरी येऊन गेला. तेथे तिच्या गळ्यात जबरदस्तीने मंगळसुत्र घातले. दोघेच घरात असताना तिच्यावर लैगिक अत्याचार केला. त्यानंतर तिची इच्छा नसतानाही वारंवार तिच्याशी शरीर संबंध ठेवत होता. फिर्यादी या बहिणीकडे गेल्या असताना आरोपीने तिच्या बहिणीला फोन करुन तिला माझ्याकडे पाठव नाही तर मी तिचे अश्लिल फोटो इंन्स्टाग्रामवर व्हायरल करेल, अशी वारंवार धमकी दिली.

बनावट इन्स्टाग्रामवरील फोटो बहिणीच्या इन्स्टाग्रामवर पाठविून फिर्यादीची बदनामी केली.
बहिणीच्या मोबाईल नंबर टाकून मी आत्महत्या करतो, अशी सुसाईट नोट लिहून तो
फोटो इन्स्टग्रामवर पोस्ट केला. त्यामुळे घाबरलेल्या फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.
सहायक पोलीस निरीक्षक दोडमिसे तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | ‘उमेदवार द्यायचा नाही आता कोणाला पाडायचं ते पाडा’, मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; म्हणाले – ‘गनिमी काव्याने समाजाची ताकद दाखवू’

Pune Politics News | इच्छुकांची नाराजी दूर झाली पण त्यांच्यासाठी जीव तोडून काम करणारे कार्यकर्ते अद्याप संतप्तच?

Sunil Tatkare On Jayant Patil | सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा; म्हणाले – ‘अजित दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर…’

Devendra Fadnavis On Jayant Patil | “सिंचन घोटाळ्यावरून फडणवीसांनी अजित पवारांना ब्लॅकमेल केलं”, जयंत पाटलांचा मोठा आरोप, फडणवीस म्हणाले,…

You may have missed