Wanwadi Pune Crime News | अग्निशमन दलाकडून भाऊबीजेच्या दिवशी भाऊ -बहिणीला जीवदान; विषारी औषध पिऊन केला होता आत्महत्येचा प्रयत्न

Fire Brigade

पुणे : Wanwadi Pune Crime News | वानवडी येथील कृष्ण कन्हैया सोसायटीत दुसर्‍या मजल्यावरील सदनिकेत भाऊ व बहिण दरवाजा लॉक होऊन अडकले असल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे जवान रवाना झाले. त्यांनी दरवाजा उघडला. आतमध्ये भाऊ बहिण बेशुद्ध अवस्थेत पडले होते. मानसिक विवंचनेतून भाऊबहिणींनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता (Attempt To Suicide). दोघांना तातडीने औषधोपचार मिळाल्याने त्यांची प्राण वाचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी (Pune Fire Brigade) भाऊबीजेच्या दिवशी भाऊ -बहिणींना जीवदान दिले आहे. (Wanwadi Pune Crime News)

वानवडीतील विकासनगरमधील कृष्ण कन्हैया सोसायटीत हा प्रकार घडला़ घटनास्थळी जवान पोहोचताच तिथे उपस्थित पोलिस कर्मचारी यांच्याकडून माहिती घेतली असता, सदनिकेत भाऊ (वय १९) व बहिण (वय २४) हे आतमध्ये स्वत: घरगुती कारणानिमित्त मानसिक विंवचनेत असून जीवाचे बरे वाईट करण्याचे सांगत आहेत. त्यांची आई बाहेर होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जवानांनी क्षणाचा ही विलंब न करता अग्निशमन उपकरण डोअर ब्रेकर, कटावणी, पहार यांच्या साह्याने सुमारे दहा मिनिटातच सदनिकेचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

त्याचवेळी दोघे ही जण बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पाहताच जवानांनी तातडीने अग्निशमन दलाच्या
वाहनातूनच जवळच असलेल्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
जवानांनी डॉक्टर यांच्याकडे त्या दोघांविषयी चौकशी केली असता,
डॉक्टरांनी या दोघांना अगदी वेळेत उपचाराकरिता दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले
असून सद्यस्थितीत दोघे ही लवकरच बरे होतील असे सांगण्यात आले.
दिवाळी सणात भाऊबीजेच्या दिवशी उचित वेळेत केलेली कामगिरी भाऊ व बहिणेचे प्राण वाचविता आले, हे जवानांना समाधान देणारे होते.


या घटनेत वाहनचालक दत्ता अडाळगे, सत्यम चौंखडे तसेच जवान सुभाष खाडे, सागर दळवी, निलेश वानखेडे, श्रेयस मेटे, महेश पांडे, सुरज हुलवान, हर्षवर्धन खाडे, अनुराग पाटील, रितेश मोरे यांनी सहभाग घेतला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Rashmi Shukla | राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवलं; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘उमेदवार द्यायचा नाही आता कोणाला पाडायचं ते पाडा’, मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; म्हणाले – ‘गनिमी काव्याने समाजाची ताकद दाखवू’

Pune Politics News | इच्छुकांची नाराजी दूर झाली पण त्यांच्यासाठी जीव तोडून काम करणारे कार्यकर्ते अद्याप संतप्तच?

Sunil Tatkare On Jayant Patil | सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा; म्हणाले – ‘अजित दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर…’

Devendra Fadnavis On Jayant Patil | “सिंचन घोटाळ्यावरून फडणवीसांनी अजित पवारांना ब्लॅकमेल केलं”, जयंत पाटलांचा मोठा आरोप, फडणवीस म्हणाले,…

You may have missed