Parvati Assembly Election 2024 | पर्वती मतदारसंघात अश्विनी कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ, पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी मोठा पाठिंबा; म्हणाल्या, “जनतेचा जिव्हाळा, माया हीच माझी ताकद”
पुणे: Parvati Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. शहरात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, भाजप विरुद्ध काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप अशा मुख्य लढती रंगणार आहेत. जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी, दोन्हीकडचे उमेदवार तगडे असल्याने बहुतांश लढती चुरशीच्या असणार आहेत. प्रचारात कोण, कशी बाजू मांडतो, प्रचाराची रणनीती काय असणार त्यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. (Parvati Assembly Election 2024)
दरम्यान (दि.५) सहकारनगर पद्मावती परिसरातील अरणेश्वर मंदिरात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी नितीन कदम (Ashwini Nitin Kadam) यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी काढण्यात आलेल्या पदयात्रा प्रचार रॅलीत ग्रामदैवत अरणेश्वर, पद्मावती देवी, तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास वंदन करून आणि आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला.
पदयात्रा प्रचाराची सुरुवात अरण्येश्वर मंदिर टांगेवाला कॉलनी अध्यापक कॉलनी येथून झाली, तर यात्रेचा समारोप शंकर महाराज वसाहत येथे झाला. या भागात पदयात्रेत ठिकठिकाणी जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली.
पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी अश्विनी कदम यांना सर्वांचे निरपेक्ष प्रेम, कौतुक आणि पाठिंबा मिळाला. माझ्या जनतेचा हा जिव्हाळा, माया हीच माझी ताकद आहे, अशा भावना अश्विनी कदम यांनी व्यक्त केल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार प्रभारी अध्यक्ष अंकुश काकडे,
काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, प्रवक्ते मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष अभय छाजेड,
माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, अशोक हरणावळ, राहुल तुपेरे, शिवसेना विभागप्रमुख सूरज लोखंडे,
पर्वती विधानसभा अध्यक्ष शशिकांत तापकीर, वैजनाथ वाघमारे, पुरुषोत्तम ओव्हाळ, संजय दामोदरे आदी मविआ व इंडिया फ्रंटचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पर्वतीकर नागरिक महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
या मतदारसंघात महायुतीकडून माधुरी मिसाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
तर त्यांना मविआच्या अश्विनी कदम यांचे आव्हान असणार आहे. त्यातच अपक्ष उमेदवार आबा बागुलही
निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा