Kothrud Assembly Election 2024 | ‘हरिनामाच्या नामस्मरणात अलौकिक आनंद मिळतो’; जयभवानीनगर येथील काकड आरती सोहळ्यास चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
पुणे: Kothrud Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यंदा राज्यातील निवडणूक रंगतदार असणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) अशी प्रामुख्याने लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान सर्वपक्षीय प्रचाराला वेग आला आहे. शहरातील कोथरूड मतदारसंघ चर्चेत आहे. मतदारसंघात मविआ आणि महायुतीच्या दोन्ही उमेदवारांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भेटीगाठी, सभा, दौरे सुरु आहेत.
दरम्यान कोथरूड मतदारसंघातील जयभवानीनगर येथील श्रीगणेश विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित काकड आरती सोहळ्यात कोथरूड मतदारसंघाचे भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे सहभागी होत विठुरायाच्या नामस्मरणात रमल्याचे पाहायला मिळाले. सकाळच्या प्रहारी हरिनामाच्या नामस्मरणात अलौकिक आनंद मिळतो, असे पाटील म्हणाले.
यावेळी भाजपा दक्षिण मंडल उपाध्यक्ष संदीप मोरे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. नितीन शिंदे, भाजपाचे कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, रिपाइंचे नेते ॲड. मंदार जोशी, अनिता तलाठी, सुरेखा जगताप, आशुतोष वैशंपायन, अजय मारणे, गणेश दहिभाते, हभप शिवाजी कदम महाराज, मयूर मारणे, सुयश ढवळे, मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ मराठे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांच्या पुढाकारामुळे मुस्लिमांची अतिक्रमणे हटली !