Parvati Assembly Election 2024 | पर्वती मतदार संघात ‘एक मराठा लाख मराठा’ची चर्चा वाढल्याने अंतिम टप्प्यात ‘चुरस’ वाढणार

Parvati Assembly

पुणे : Parvati Assembly Election 2024 | पर्वती मतदार संघामध्ये काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये (Sharad Pawar NCP) बंडखोरी झाल्याने भाजपची (BJP) वाट वरकरणी सुकर झालीय. परंतु त्याचवेळी मराठा समाजाने (Maratha Samaj) ग्राउंड लेव्हलला ‘एक मराठा, लाख मराठा’ चां नारा देत काम सुरू केल्याने चुरस वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

पर्वती मतदार संघ पूर्वी राखीव होता. त्यामुळे वीस वर्ष मराठा व अन्य खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी मिळाली नाही. २००९ मध्ये पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ खुला झाला. तेंव्हापासून भाजप शिवसेना युतीच्या माधुरी मिसाळ (Madhuri Misal) या सलग तीन वेळा येथून आमदार झाल्या असून यंदा महायुतीने (Mahayuti) त्यांना पुन्हा संधी दिली आहे. २०२९ मध्ये मतदार संघांची पुन्हा फेररचना होणार असल्याने नव्याने कोणता भाग जोडला जाणार यावर या मतदार संघाचे भवितव्य ठरणार आहे.

मतदार संघामध्ये सर्वाधिक मराठा समाज असताना मागील ३५ वर्षात एकदाही प्रतिनिधित्व मिळाले नाही ही खंत मराठा समाजात आहे. त्यामुळे आता शेवटची संधी म्हणून मराठा समाज एकवटत आहे. याला मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarane Patil) यांच्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) मोहिमेने बळ मिळालं आहे. यापूर्वी झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील संघटना या भाजपच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळत होते. जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मात्र मराठा समाजाचा प्रामुख्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात रोख दिसून येत आहे. हीच बाब लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसून आली असून विधानसभा निवडणुकीत देखील ही धग कायम आहे.

हेच गणित मांडून पर्वती मध्ये मराठा उमेदवाराच्या पाठीशी ताकत उभी करण्यासाठी गणिते मांडली जावू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सचिन तावरे (Sachin Taware) यांनी देखील हेच गणित मांडून तयारी सुरू केली होती. परंतु पक्षाने मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या अश्विनी कदम (Ashwini Nitin Kadam) यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्या देखील मराठा समाजातील सून आहेत. तावरे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडीनंतर तावरे यांचा अर्ज कायम राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अंकुश काकडे यांनी तावरे यांनी माघार घेतली असून कदम यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे.

या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण लढ्यातील स्थानिक पुढाऱ्यांनी पुढाकार घेवून मराठा समाजाची मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत (PMC Election) देखील याचा फायदा होईल या दृष्टीने याचा फायदा होईल याचे गणित मांडले जात आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षातील मराठा कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी पावले उचलण्यात येत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांच्या पुढाकारामुळे मुस्लिमांची अतिक्रमणे हटली !

Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांमुळे औंध -बाणेर रस्त्याचा तीस वर्षांपूर्वीचा प्रश्न सुटला..!

You may have missed