Parvati Assembly Election 2024 | सारसबागेत ‘पहाटेचा संवाद’ या माध्यमातून अश्विनी कदम यांच्या नागरिकांशी भेटीगाठी; म्हणाल्या – “संवादातून नागरिकांचे प्रश्न कळतात, त्यावर उपाय शोधण्याची उमेद मिळते”

Ashwini Nitin Kadam

पुणे: Parvati Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात उमेदवारांनी जोरदार तयारी सुरु केलेली आहे. विविध कार्यक्रमांच्या आणि उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करताना दिसत आहेत. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे उमेदवार प्रचाराची विविध तंत्रे वापरत जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

पर्वती मतदारसंघात यंदा तिरंगी निवडणूक होणार आहे. तिन्ही उमेदवारांकडून प्रचार केला जात आहे. आज (दि.७) ‘पहाटेचा संवाद’ या माध्यमातून मविआच्या उमेदवार अश्विनी नितीन कदम (Ashwini Nitin Kadam) यांनी पहाटे ६:०० वाजता सारसबागेत जात नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान नागरिकांचे प्रश्न, अडचणी, मतदारसंघाबाबत अपेक्षा जाणून घेता आल्या.

यावेळी अश्विनी कदम म्हणाल्या, “संवादातून नागरिकांचे प्रश्न कळतात, त्यावर उपाय शोधण्याची उमेद मिळते. ‘संवाद’ हा शब्द लहान वाटत असला तरी कितीतरी सामर्थ्य या शब्दात दडले आहे. म्हणूनच नेहमीच माझा प्रयत्न हा संवादाचा राहिला आहे.”

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांच्या पुढाकारामुळे मुस्लिमांची अतिक्रमणे हटली !

Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांमुळे औंध -बाणेर रस्त्याचा तीस वर्षांपूर्वीचा प्रश्न सुटला..!

You may have missed