Pune ACB Demand Trap News | जॅमर काढण्यासाठी लाचेची मागणी करणार्या सहायक फौजदारासह ट्राफिक वॉर्डनवर गुन्हा दाखल
पुणे : Pune ACB Demand Trap News | नो पार्किंगमध्ये लावलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीचा जॅमर काढण्यासाठी लाच मागणाºया सहायक फौजदारासह ट्रॉफिक वॉर्डनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune ACB Demand Trap News)
सहायक फौजदार किरण दत्तात्रय रोटे Kiran Dattatrya Rote (वय ५१, समर्थ वाहतूक विभाग) आणि ट्रॉफिक वॉर्डन अनिस कासम आगा (वय ४८, रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. (Pune Bribe Case)
याबाबत एका ३० वर्षाच्या तरुणाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या नो पार्किंगमध्ये लावलेल्या स्विफ्ट डिझायर कारला जॅमर लावण्यात आला होता. तो जॅमर काढण्यासाठी ट्राफिक वॉर्डन यांनी तक्रारदार यांच्याकडे १ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी ११ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. त्यात अनिस आगा याने तक्रारदार यांच्याकडे १ हजार रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती ७०० रुपये स्विकारण्याचे मान्य केले.
तसेच अनिस आगा कार्यालयात उपस्थित नसताना सहायक फौदार किरण रोटे याने अनिस आगा
याने मागिलेले पैसे माझ्याकडे दे असे म्हणून लाच घेण्यास संमती दर्शवून प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे किरण रोटे, अनिस आगा यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांच्या पुढाकारामुळे मुस्लिमांची अतिक्रमणे हटली !