Chhagan Bhujbal On ED And BJP | ‘ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही भाजपबरोबर’, भुळजबळांच्या दाव्याने राजकारणात खळबळ; म्हणाले – “मी OBC असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे, उच्च जातीचा असतो तर…’

Chhagan Bhujbal

मुंबई: Chhagan Bhujbal On ED And BJP | राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे (Maharashtra Assembly Election 2024). सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. दैनंदिन राजकीय घडामोडी वाढत आहेत. अशातच आता ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई (Rajdeep Sardesai) यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ (2024: The Election that Surprised India) या पुस्तकातुन अनेक खुलासे समोर आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते (Ajit Pawar NCP), मंत्री छगन भुजबळ यांनी महत्वाच्या घडामोडींवर भाष्य केले आहे.

“अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका… ती झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला… माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता…”, असे भाष्य छगन भुजबळ यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

‘मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते’, भुजबळांचे हे विधान निवडणुकीच्या धामधुमीत राजकारणाला वेगळी दिशा देणारे आहे.

राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार हे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आदी काही प्रमुख नेत्यांना घेऊन महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. दरम्यान ईडीच्या भीतीने हे नेते भाजपबरोबर गेल्याची टीका विरोधक करीत होते. मात्र आता खुद्द भुजबळ यांनी जाहीर कबुली दिल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

छगन भुजबळ म्हणाले, ” दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. आधी १०० कोटींच्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे आणखी एक नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती.

‘तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल’, असा निरोप देशमुख यांना देण्यात आला होता. आता ते मलाही अडकविण्याचा पुन्हा प्रयत्न करीत असावेत. अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही.

अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक अशा विविध नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागले होते. मला, देशमुख व मलिकांना ईडीने अटक केली होती. अशा वेळी पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती.

हा विषय आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडला. पवारांना हे सारे समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते. तेव्हा अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्षाच्या बहुतांशी नेत्यांना मान्य होता. भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाली’, अशी भावना भुजबळांनी व्यक्त केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune ACB Demand Trap News | जॅमर काढण्यासाठी लाचेची मागणी करणार्‍या सहायक फौजदारासह ट्राफिक वॉर्डनवर गुन्हा दाखल


You may have missed