Shivaji Nagar Assembly | सुरक्षा आणि वाहतूक कोंडी सोडविण्यात शिवाजीनगरमधील आमदार, नगरसेवकांना आले अपयश
पुणे : Shivaji Nagar Assembly | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पुणे दौर्यात ज्या मतदारसंघातील समस्याविषयी राष्ट्रपती कार्यालयाने खडसावले, त्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात वाहतूक कोंडी (Traffic Jam In Shivaji Nagar), खराब रस्ते यामुळे लोकांचे जगणे असाह्य झाले आहे. शिवाजीनगर मतदारसंघात शहरातील सर्वाधिक झोपडपट्टया येतात. तेथील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच या भागात शाळा, महाविद्यालयांची संख्या अधिक आहे. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थीनीच्या सुरक्षेविषयी प्रयत्न करण्याची आवश्यकता होती. वाहतूक कोंडी ही तर शिवाजीनगर मतदारसंघाच्या जन्मालाच पुजली असल्याचे दिसून येते.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक भाजपचे नगरसेवक व गेली १० वर्षे भाजपचे आमदार असतानाही या समस्या सोडविण्यात त्यांनी फारसे प्रयत्न केले नसल्याचे नागरिकांचे मत आहे. येथील बहुतेक प्रमुख नेते हे मागील महापालिका निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये गेले होते. काँग्रेसचे संघटन कमकुवत असतानाही लोकसभा निवडणुकीत भाजपचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना अगदी मामुली मताधिक्य मिळाले होते. यातूनच या मतदारसंघातील मतदार हे भाजपच्या (BJP) नगरसेवक व आमदारांवर नाराज असल्याचा निकर्ष सर्व्हे मध्ये काढण्यात आला.
या पावसाळ्यात मुळा आणि मुठा नदीला मोठा पुर (Pune Flood) आला होता. त्यात खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) पाणी सोडल्याने सिंहगड रोड परिसरातील (Sinhagad Road) सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. त्याची दखल अगदी मुख्यमंत्र्यांपासून सर्वांनी घेतली. पण, त्याचवेळी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पाटील इस्टेट, औंध परिसरातील (Aundh) अनेक झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरुन मोठे नुकसान झाले. पण आमच्याकडे कोणीही फिरकले नसल्याच्या तक्रारी अजूनही तेथील नागरिक करत असतात.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात (University Chowk Pune) मेट्रोचा उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. कोरोना काळात येथील उड्डाणपुल पाडण्यात आला. परंतु, त्याचे काम सुरु करण्यास खूप काळ मध्ये गेला. उड्डाणपुलाच्या कामामुळे संपूर्ण गणेशखिंड रोडवरील (Ganesh Khind Road) रस्ताची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. पावसाळ्यातील चार -पाच महिन्यात लोकांना अक्षरश जीव मुठीत धरुन वाहन चालवावे लागत होते. अगदी राष्ट्रपती यांनाही त्रास त्यास जाणवला तरी त्याची महापालिकेला काही फिकीर ना येथील लोकप्रतिनिधींना. आजही येथील रस्ता म्हणजे खड्ड्या खड्यांतून वाट काढावी लागते.
म्हाडाच्या पूरग्रस्त वसाहतीचा मोठा प्रश्न या भागात आहे. राज्य शासनाने वर्षानुवर्षे काहीच निर्णय न घेतल्याने लोकांनी जुनी, कमकुवत झालेली घरे पाडून नवीन घरे बांधली़ कुटुंब वाढल्याने वरतील मजले चढवले. त्यावर महापालिकेने दुप्पट, तिप्पट मिळकत कर आकारला. या वसाहतीचा मुळ प्रश्न वर्षानुवर्षे भिजत पडलेला असताना आता निवडणुक जवळ आल्यावर आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांनी विधानसभेत यावर आवाज उठविला. शासनाने लगेच वाढीव मिळकत कर आकारण्यास स्थगिती दिली. त्याचे मोठमोठे बॅनर लावून जाहिरातबाजी करण्यात आली.
या भागातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून वेताळ टेकडीवर दोन बोगदे आणि बालभारती ते पौडफाटा येथे डोंगरावरुन रस्ता करण्याचे प्रस्तावित आहे. या बोगद्यांना पर्यावरण प्रेमी नागरिकांचा विरोध आहे. पण, याबाबत आमदारांनी आपली भूमिका कधीही स्पष्ट केली नाही. आमदार झाल्यानंतरही त्यांनी नगरसेवकपद कायम ठेवले. त्यामुळे त्यांच्या वॉर्डातील लोकही अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहिले. पीएमपीएमएलच्या संचालक पदी त्यांची निवड झाली होती.
शहरातील वाहतूक सुधारणा घडवून आणण्याची चांगली संधी त्यांना या पदामुळे मिळाली होती. परंतु, त्यांनी पुणेकरांना पीएमपीची चांगली सेवा मिळवून देण्यासाठी उपयोग करण्याची संधी घालविली. आजही पीएमपीची पुणेकरांना पुरेसी सुविधा मिळू शकत नाही. त्यातून शहरातील दुचाकीची संख्या वाढून वाहतूक कोठडीत भर पडताना दिसून येत आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा