Sunil Shelke MLA | अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळकेंच्या अडचणीत वाढ, शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
मावळ: Sunil Shelke MLA | राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) धामधूम सुरु आहे. नेत्यांच्या बैठका, सभा, दौरे वाढले आहेत. यंदा मावळ विधानसभा मतदारसंघ (Maval Assembly Election 2024) मावळ पॅटर्न मुळे चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
रात्री १० वाजल्यानंतर निवडणूक प्रचार फेरी काढून नियमांचा भंग केल्याप्रकरणी मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case Against Sunil Shelke)
रात्री पावणेबारा वाजेपर्यंत प्रचार फेरी काढण्यात आली. याप्रकरणी निवडणूक विभागाचे कर्मचारी दीपक भाऊराव राक्षे (वय ५३, रा. सोमाटणे फाटा) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात (Shirgaon Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आमदार शेळके (वय ४५) यांच्यासह नामदेव सावळेराम दाभाडे (दोघे रा. तळेगाव दाभाडे) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मावळचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार, आमदार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ दाभाडे यांनी मंगळवारी (दि.५) शिरगाव हद्दीतील आढले खुर्द व चांदखेड या गावांमध्ये प्रचार फेरीचे आयोजन केले होते.
त्यासाठी मावळ विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियम
व अटीनुसार प्रचार फेरीला परवानगी दिली होती.
मात्र, ही फेरी रात्री १० वाजल्यानंतर काढण्यात आली.
रात्री १० नंतर प्रचारास बंदी असताना देखील ही फेरी काढण्यात आली.
रात्री पावणेबारा वाजेपर्यंत फेरी सुरू होती. त्यामुळे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chhagan Bhujbal On ED And BJP | ‘ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही भाजपबरोबर’, भुळजबळांच्या दाव्याने
राजकारणात खळबळ; म्हणाले – “मी OBC असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे, उच्च जातीचा असतो तर…’
Pune ACB Demand Trap News | जॅमर काढण्यासाठी लाचेची मागणी करणार्या सहायक फौजदारासह ट्राफिक वॉर्डनवर गुन्हा दाखल