Bhor Assembly Election 2024 | विद्यमान आमदारांचा सर्वसामान्यांशी संपर्क नाही; महायुतीच्या शंकर मांडेकरांची संग्राम थोपटे यांच्यावर टीका

Shankar Mandekar

भेटी- गाठी आपल्या माणसांच्या दौऱ्याची सुरुवात

मुळशी : Bhor Assembly Election 2024 | विद्यमान आमदारांचा सर्वसामान्यांशी संपर्क नाही. अशी टीका महायुतीच्या शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांनी आंधळे गाव येथे आयोजित केलेल्या भेटी – गाठी आपल्या माणसांच्या या दौऱ्यात केली.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी साठी सर्व उमेदवारांनी कंबर कसली आहे. भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ भेटी- गाठी आपल्या माणसांच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आले आहे. आंधळे, कातरखडक, खांबोली, पिंपळोली, जवळगाव केमशेवाडी, पडळघर वाडी, रिहे, घोटावडे, मुलखेड, नांदे, लवळे, सुस, म्हाळुंगे या गावांना त्यांनी भेट दिली या भेटी दरम्यान ग्रामस्थांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी मांडेकर यांचे जल्लोषात स्वागत केले. या दौऱ्याला प्रचंड गर्दी पाहिला मिळाली. गाव भेटीदरम्यान गावकऱ्यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे तसेच तालुक्यातील रखडलेली विकासाची कामे ही मांडेकर यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण होतील अशी आशा गावकऱ्यांनी व्यक्त केली. “बच्चा बच्चा जानता है शंकर भाऊ सच्चा है” अशी घोषणा देत गावातील लहान मुलांनी सुद्धा या प्रचारामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला.

मांडेकर म्हणाले “सर्वसामान्य जनतेचा मी कार्यकर्ता आहे. माझा तळागाळातील लोकांपर्यंत संपर्क आहे. गावकऱ्यांना मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नाहीत याची खंत आहे. गावातील रस्ते, आरोग्य सुविधा यांच्या कडे प्रामुख्याने लक्ष देऊन त्या चांगल्या दर्जाच्या करून देण्याचे आश्वासन देतो. गेली पंधरा वर्षे आमदारांनी केलेल्या दुर्लक्षामुळे तालुक्यात रोजगार, शिक्षण,आणि गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. मतदारांनी संधी दिल्यास मतदारसंघाला प्रगतीच्या नव्या शिखरावर पोहोचवण्याची ग्वाही त्यांनी या दौऱ्या दरम्यान सर्व मतदारांना केली.

ह्या भेटीत मतदारसंघातील महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला शंकर मांडेकर यांचे स्वागत त्यांनी औक्षण करून केले आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) यामुळे त्यांना झालेल्या लाभाबद्दल महिलांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे (Mahayuti) आभार मानले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sunil Shelke MLA | अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळकेंच्या अडचणीत वाढ, शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Shivaji Nagar Assembly | सुरक्षा आणि वाहतूक कोंडी सोडविण्यात शिवाजीनगरमधील आमदार, नगरसेवकांना आले अपयश

Parvati Assembly Election 2024 | ‘मतदारसंघातील जनता विजयाची तुतारी वाजवणारच’, अश्विनी कदम
यांचा विश्वास, पदयात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग

hhagan Bhujbal On ED And BJP | ‘ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही भाजपबरोबर’, भुळजबळांच्या दाव्याने
राजकारणात खळबळ; म्हणाले – “मी OBC असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे, उच्च जातीचा असतो तर…’

Pune ACB Demand Trap News | जॅमर काढण्यासाठी लाचेची मागणी करणार्‍या सहायक फौजदारासह ट्राफिक वॉर्डनवर गुन्हा दाखल

You may have missed