Pune Crime News | दुसर्‍याच्या त्रासाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; पहिल्या पतीच्या मुलीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

Suicide

पुणे : Pune Crime News | पहिल्या पतीने सोडून दिल्यावर ती दोन मुलीसह एका बरोबर रहात होती. पण तो तिला सातत्याने त्रास देत असे. तिला आत्महत्या करण्यास चिथावणी देत. त्याच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षाच्या महिलेने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केली. (Suicide Case)

याबाबत तिच्या १८ वर्षाच्या मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे़ त्यावरुन पोलिसांनी ३५ वर्षाच्या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आंबेगाव पठार परिसरात ७ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला पहिल्या पतीने सोडले असून त्यांना दोन मुली आहे. गेल्या ७ ते ८ वर्षांपासून त्या, दोन मुलीसह आरोपीबरोबर रहात होत्या. आरोपीने फिर्यादीच्या आईस मानसिक व शारीरीक त्रास दिला. तसेच सतत मारहाण करुन शिवीगाळ करत असे. आरोपी याने काढलेला व्हिडिओ फिर्यादीने पाहिला असून त्यामध्येही आरोपी हा फिर्यादीच्या आईस आत्महत्या करण्यास चिथावणी देत असल्याचे दिसून येत आहे.

त्याच्या छळाला कंटाळून महिलेने गुरुवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक कोळी तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ – सुप्रिया सुळे (Video)

You may have missed