Model Code Of Conduct Pune | आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पुण्यात दोन गुन्हे दाखल; सिंहगड रस्ता पोलिसांकडून कारवाई

Model Code Of Conduct

पुणे: Model Code Of Conduct Pune | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांकडून (Sinhagad Road Police) दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिंहगड रस्ता भागातील मानस सोसायटी ते क्रिस्टल कॅस्टल सोसायटी रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू आहे. ‘रहिवाशांना होणाऱ्या तसदी बद्दल क्षमस्व, भारतीय जनता पक्षाचे खडकवासाला मतदार संघाचे उमेदवार भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांच्या विकास निधीतून’ अशा आशयाचा फलक लावण्यात आला होता.

फलकावर सौजन्य म्हणून सारंग भोसले असे नाव लिहिण्यात आले होते. आचारसंहितेचा भंग ठरत असल्याने आचार संहिता भंग केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनुराग राजेशकुमार यांनी फिर्याद दिली आहे.

तर दुसरीकडे परवानगी न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदावर मयुरेश वांजळे यांच्या प्रचार कार्यालयामोर गाड्या उभ्या होत्या. गाड्यांवर पक्षाचे चिन्ह आणि छायाचित्र लावण्यात आले होते. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन मोटारचालकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तर दुसरीकडे परवानगी न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मयुरेश वांजळे यांच्या प्रचार कार्यालयामोर गाड्या उभ्या होत्या. गाड्यांवर पक्षाचे चिन्ह आणि छायाचित्र लावण्यात आले होते. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन मोटार चालकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ – सुप्रिया सुळे (Video)

You may have missed