Maharashtra Assembly Election 2024 | पक्ष चिन्हावरून जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल; म्हणाले – ” जगात असा पक्ष पाहिला नाही की…”

Jayant Patil-Ajit Pawar

सोलापूर: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान प्रचार सभेत बोलताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे (Sharad Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. (Jayant Patil On Ajit Pawar)

जयंत पाटील म्हणाले, ” आमचे घड्याळ चिन्ह चोरीला गेले आहे. पण, पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागते आहे की, आमचे चिन्ह ‘न्याय प्रविष्ट’ आहे. ऑस्ट्रेलियात, चीन, पाकिस्तानमध्ये जा, पण अशी वेळ कोणत्याच पक्षावर आली नाही. (Maharashtra Assembly Election 2024)

आमचे हे चिन्ह आहे, पण न्यायप्रविष्ट आहे हे सांगावे लागते आहे, आमचे घड्याळ चोरीला गेले आहे त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस आम्ही चिन्ह घेतले आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर केली आहे.

ते पुढे म्हणाले, ” भारतातील ८०० रेल्वे स्टेशनवर वायफाय (WiFi) फ्री मिळावे यासाठी सरकारने गुगलसोबत साडेचार लाख कोटीचा करार केला. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ८६ हजार कोटी यांच्याकडे नाहीत. तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजे की वायफाय (WiFi)? असा सवाल जयंत पाटील यांनी केला.

“दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात जाऊन १०० टक्के खात्री पटली आहे की,
लोक महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे.
या भागाला स्मार्ट सिटी बनवणार होते. १० वर्षांत झाले का आपले शहर स्मार्ट?
या शहरात बऱ्याच नव्या गोष्टी आपण आणू शकतो. महाविकास आघाडीला पूर्ण ताकदीने,
भक्कमपणे साथ द्या”, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात
मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ – सुप्रिया सुळे (Video)

You may have missed