Sahakar Nagar Pune Crime News | पुणे: सोशल मीडियावरील ओळखीतून युवकाने 16 वर्षाच्या मुलीवर केला जबरदस्तीने लैंगिक अत्याचार

Rape-Case-Instagram

पुणे : Sahakar Nagar Pune Crime News | सोशल मीडियावरुन ओळख करुन घेऊन अल्पवयीन मुलीच्या इमारतीमधील मित्राकडे येऊन १६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Rape Case)

याप्रकरणी एका ३५ वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका १९ वर्षाच्या मुलावर पोस्को अंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२४ ते २ नोव्हेबर २०२४ दरम्यान घडला आहे. ( Sahakar Nagar Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १६ वर्षाच्या मुलीशी इन्स्टाग्रामवर (Insta Friend) ओळख करुन तिच्याशी मैत्री वाढविली. फिर्यादी राहतात, त्या इमारतीतील मित्राचे घरी तो आला. त्याने फिर्यादीच्या मुलीला तेथे बोलवून घेतले. तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relationship) केले. त्यानंतर २ नोव्हेबर रोजी तो फिर्यादीच्या घरी आला. फिर्यादीच्या मुलीला पुन्हा सोबत येण्यास बळजबरी केली.

फिर्यादीच्या मुलीने सोबज जाण्यास नकार दिल्या असता तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही बाब फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | पक्ष चिन्हावरून जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल; म्हणाले – ” जगात असा पक्ष पाहिला नाही की…”

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ – सुप्रिया सुळे (Video)

You may have missed