Kothrud Assembly Election 2024 | कोथरूडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून भारावलो!- चंद्रकांतदादा पाटील

Chandrakant Patil

हिंदू विरशैव लिंगायत समाजाचा चंद्रकांतदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा

पुणे: Kothrud Assembly Election 2024 | कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून; ज्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे; तो पाहून अतिशय भारावून गेलो आहे. कोथरूड मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी भावना चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली. यावेळी हिंदू विरशैव लिंगायत समाजाने चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आला.

भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रॉलीला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुतारवाडीतील भैरवनाथ मंदिर येथे भैरवनाथांचे दर्शन घेऊन रॉलीचा शुभारंभ झाला. तर सोमेश्वर मंदिरात रॅलीचा समारोप झाला. या संपूर्ण रॉलीदरम्यान ठिकठिकाणी ढोलताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टीने पाटील यांचे स्वागत करण्यात आले. महिलांनीही औक्षण करुन पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजपा- महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून ज्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे; तो अभूतपूर्व आहे. गेल्या पाच वर्षांत जशी तुम्हा सर्वांची समर्पित होऊन सेवा केली; तशीच सेवा पुढील पाच वर्षांत ही करेन. निधीची कुठेही कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.यावेळी हिंदू विरशैव लिंगायत समाजाने चंद्रकांतदादा पाटील यांना आपला जाहीर पाठिंबा दिला. त्याबद्दल पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी भाजप कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, आबासाहेब सुतार, रोहन कोकाटे, सचिन दळवी, विवेक मेथा, शिवम सुतार, सुभाष भोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे, प्रमोद निम्हण, बालम सुतार, रोहिणी चिमटे, रिपाइंचे संतोष सुतार, भाजपा नेत्या वंदना सिंह, स्नेहल सुतार, कल्याणी टोकेकर, जागृती विचारे, सुरेखा वाबळे, प्रमोद कांबळे, उत्तम जाधव, विकास पाटील यांच्यासह भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ – सुप्रिया सुळे (Video)

You may have missed